Amruta Fadnavis | ‘जागतिक कामांबद्दलचं ‘नोबेल’ गेलं; पण अमृता फडणवीस यांना भारतरत्न द्या’ – हरी नरके

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे ड्रग्स पेडलरसोबत संबंध असल्याचा गंभीर आरोप केला होता. या आरोपानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी पत्रकार परिषद घेऊन नवाब मलिक यांचे सर्व आरोप फेटाळून लावले. मात्र यावेळी त्यांना संताप अनावर झाल्याचे दिसत होतं. एकंदरीत या घटनेवरुन प्रा. हरी नरके (Hari Narke) यांनी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांना खोचक टोला लगावला आहे.

 

प्रा. हरी नरके यांनी म्हटले, मी अशी शिफारस करतो की, त्यांच्या जागतिक कीर्तीच्या कामांबद्दल त्यांचा नोबेल (Nobel) गेला बाजार भारत रत्न तरी प्रदान करण्यात यावा. या गाण्याला पैसा पुरवणारा (निर्माता) ड्रग्समाफिया सध्या गुजरातमध्ये (Gujarat) तुरुंगात (prison )आहे. तो भाडोत्री होता असा खुलासा केला तर त्यांनी अशा दुय्यमतीय्यम दर्जाच्या माणसाचे नाव काल श्रे नामावलीतून हटवले. अशा माणसाबरोबर फोटो काढून घेतला तेव्हाची त्यांची देहबोली बघा. जो माणूस इतका तिय्यम होता त्याला अंगठा दाखवत हसत फोटो काढतात? अनोळखी माणसाबरोबर अशी पोज देतात? तुम्ही काहीही खुलासे केले तरी या फोटोमधली चित्रभषा लोकांना समजते बर! असा खोचक टोला नरके यांनी लगावला आहे.

 

काय म्हणाल्या अमृता फडणवीस?

 

ज्या स्त्रिया सरळ मार्गाने जात आहेत त्यांना डिवचू नका, असं मी दोन दिवसांपूर्वीच म्हटलं होतं. देवेंद्रजींना टार्गेट करायला तेच आज माझ्याबाबतीत केलं गेलं. तुम्ही मर्द आहात ना? डायरेक्ट त्यांना टार्गेट करा. मला मध्ये नका आणू. एक समाज सेविका म्हणून मी माझे विचार प्रकट करत असते आणि करत राहणार. मला कोणही थांबवू शकत नसल्याचे अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी म्हटले.

 

Web Title : Amruta Fadnavis | writer hari narke targeted devendra fadnavis wife amruta over nawab malik shares her photo

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune News | दिवाळी निमित्त फुटपाथवरील 100 हून अधिक मुलांना कपड्यांचे वाटप; युवा उद्योजिका, फॅशन डिझायनर पायल भरेकर यांचा अनोखा उपक्रम 

RTMNU Recruitment 2021 | नोकरीची सुवर्णसंधी ! नागपूर येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठात 109 जागांसाठी भरती; पगार 24,000 रुपये

B.Ed CET Exam Result | B.Ed अभ्यासक्रमाच्या ‘सीईटी’ परीक्षेचा निकाल जाहीर