मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Amruta Fadnavis | 14 फेब्रुवारी हा दिवस व्हॅलेंटाईन दिन (Valentine’s Day) म्हणून भारतातही मोठ्या प्रमाणात साजरा केला जातोय. तरुणाई व्हॅलेंटाईन वीक (Valentine’s Week) साजरा करुन आजच्या दिवशी प्रेम भावना व्यक्त करत असतात. आजच्या प्रेमाच्या दिवसाला एक मान आहे. अनेकजण अनेक पद्धतीने आपल्या प्रेमाची भावना व्यक्त करताना दिसत असतात. आपल्या प्रिय व्यक्तीसाठी हा दिवस मोठा दिवस मानला जातो. दरम्यान, माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची पत्नी गायिका अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनीही व्हॅलेंटाईन दिवशी आपल्या संगीत, गायनावरील प्रेमाचा स्पेशल केला आहे.
अनेक सण-उत्सवा दिवशी अमृता फडणवीस यांनी आपल्या गाण्याची घोषणा केली आहे. त्यानंतर आता व्हॅलेंटाईन दिन (Valentine’s Day) त्यांनी आणखी एक घोषणाच केली आहे. लॉर्ड शिवा म्हणजे महादेवाच्या भक्तीवर आधारित हे गाणं असल्याचं त्यांच्या ट्विटवरुन वाटत आहे. खरंतर अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांचा लुक देखील त्याच पद्धतीचा दिसून येतो आहे. भगव्या वस्त्रामध्ये गळ्यात रुद्राक्षांची माळ घातलेल्या आणि हाती त्रिशूल धरल्या आहेत.
I chose you now & forever……….
You are in my heart, mind, soul, belief & breath ………
This #ValentineDay which is about praising our beloved….,
I offer my Musical Praises to my रुद्र #Valentine ……#LordShivaComing soon …..on @TimesMusicHub #ValentinesDay2022 pic.twitter.com/or9MscyX2j
— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) February 14, 2022
”मी तुला निवडले आता आणि कायमचे, हृदयात, मनात, आत्म्यात, विश्वासात आणि श्वासात तू आहेस, हा #व्हॅलेंटाईन डे जो आपल्या प्रिय व्यक्तीची प्रशंसा करतो…., मी माझ्या रुद्र…. #लॉर्डशिवाला माझे संगीतमय स्तुती अर्पण करते. तसेच, लवकरच येत आहे,” असं अमृता फडणवीस यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
Web Title :- Amruta Fadnavis | you are in my heart you are in my breath amrita fadnavis valentine special
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update