अमृता फडणवीस यांचा मराठमोळा ‘साज’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस युनिक फॅशन सेन्स, गोड आवाज आणि राजकीय शेरेबाजीमुळे सोशल मीडियावर कायम चर्चेत असतात. त्या नेहमी आपल्या नवनवीन फोटो शेअर करत असतात. आताही त्यांनी काही नवे फोटो सोशल मीडियावर शेअर केले असून यात त्या मराठमोळ्या अंदाजात अतिशय सुंदर दिसत आहेत.

अमृता फडणवीस यांनी सोशल मिडियावर शेअर केलेल्या फोटोत पेस्टल कलरची साडी परिधान केलेली आहे. भरजरी साडी, गळ्यात सुंदर हार, कपाळावर टिकली, केसात माळलेल फूल असा मराठमोळ्या अंदाजातील फोटोत त्या दिसून येत आहेत. या साध्या रुपातही त्या अतिशय सुंदर दिसत आहेत. त्यांचा हा साधा आणि सोज्वळ लूक अनेकांच्या पसंतीस उतरत आहेत.