मिसेस मुख्यमंत्र्यांच्या टीकेला मनसेकडून ‘मामूच्या मामी’ने प्रत्युत्तर

'मामूची मामी करमणुकीची नाही कमी', मनसे समर्थकांचा 'मिसेस' मुख्यमंत्र्यांवर निशाणा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना टोला लगाला होता. एका वृत्तवाहिनीली दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी राज ठाकरे म्हणजे ‘एन्टरटेनमेंट… एन्टरटेनमेंट… एन्टरटेनमेंट…’ असल्याचे उत्तर दिले होते. याच टिकेवरून अमृता फडणवीस राज समर्थकांच्या निशाण्यावर आल्या आहेत. ‘मामूची मामी, करमणुकीची नाही कमी’ असे म्हणत त्यांचा बोटीवर सेल्फी क्लिक करण्याचा व्हिडीओ शेअर केला आहे.

अमृता फडणवीस यांचा बोटीवर सेल्फी क्लिक करणारा व्हिडीओ मनसे समर्थकांनी शेअर केला आहे. या व्हिडिओला त्यांनी ‘मामूची मामी, करमणुकीची नाही कमी’ असं म्हटलं आहे. अमृता फडणवीस यांनी अरबी समुद्रात क्रूझच्या टोकावर बसून काढलेल्या सेल्फीवरून वाद निर्माण झाला होता. त्याचाच व्हिडीओ आता वापरून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस म्हणजे ‘एन्टरटेनमेंट… एन्टरटेनमेंट… एन्टरटेनमेंट…’ असं कॅप्शन देत व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. यामध्ये

#मामूची_मामी_करमनूकीची_नाही _कमी असा हॅशटॅग वापरण्यात आला आहे.
मागील वर्षी 20 ऑक्टोबर रोजी मुंबई-गोवा क्रुझ पर्यटन सेवा सुरु करण्यात आली. अमृता फडणवीस यांनी मुंबई-गोवा क्रुझवर अगदी टोकावर जाऊन सेल्फी घेतला होता. यावरुन नंतर बराच वाद झाला होता. याच सेल्फी घेण्याचा व्हिडीओ मनसेच्या समर्थकांनी फेसबूकवर पोस्ट केला आहे. या पोस्ट नंतर अमृता फडणवीस यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रीया दिलेली नाही.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा…आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध,अशी घ्या काळजी