
Amruta Khanvilkar | केवळ चार शब्दातच अभिनेत्री अमृता खानविलकरने केले ट्रॉलर्सचे तोंड बंद; व्हिडिओ व्हायरल
पोलीसनामा ऑनलाइन : मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar) तिच्या अभिनयासोबतच स्टाईलमुळे देखील नेहमीच चर्चेत असते. अमृताला एक फॅशन आयकॉन म्हणून देखील ओळखले जाते. अमृताने आजवर केवळ मराठीतच नाही तर हिंदी भाषेतही काम केले आहे. त्यामुळे मराठी सोबतच हिंदी चाहत्यांची देखील संख्याही मोठी आहे. अमृताने अनेक हिंदी रियालिटी शो मध्ये देखील सहभाग नोंदवला होता. अमृताला (Amruta Khanvilkar) अनेकदा तिच्या फॅशन सेन्समुळे ट्रोल देखील केले होते. यावर अमृताने ट्रोलर्सला चांगलेच सडेतोड उत्तर दिले आहे.
एका कार्यक्रमादरम्यान अमृता खानविलकर आणि ‘आदिपुरूष’ चित्रपटाचे दिग्दर्शक ओम राऊत एकत्र होते. यावेळी ओम आणि अमृता यांनी अनेक विषयांवर गप्पा मारल्या. याचाच एक प्रोमो सध्या सोशल मीडियावर वायरल होताना दिसत आहे. ज्यामध्ये अमृताने सोशल मीडियावर ट्रोल करणाऱ्या ट्रोलर्सला चांगलेच खडे बोल सुनावले आहेत.
प्रोमोमध्ये दिसत आहे की ओम आणि अमृता दोघेही बर्गर बडीज असल्याचे सांगतात.
एवढेच नाही यावेळी अमृता म्हणते की, “माझ्या वडिलांनी आतापर्यंत मला नाचताना कधीच बघितलं नाही”.
या कार्यक्रमात अमृताला (Amruta Khanvilkar) विचारण्यात आले होते की एका वाक्यात तू ट्रोलर्सना काय
सांगशील? यावर उत्तर देताना अमृता म्हणाली “खूप वेळ आहे तुमच्याकडे”.
सध्या अमृताचे हे उत्तर सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.
केवळ चार शब्दात अमृताने ट्रोलर्सचे तोंड बंद केले आहे.
अमृता आणि ओम राऊत यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल होताना दिसत आहे.
Web Title :- Amruta Khanvilkar | actress amruta khanvilkar replies trollers says you have lots of time
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Parbhani Crime News | धक्कादायक ! जीवे मारण्याची धमकी देऊन विवाहित महिलेचा केला गर्भपात