अमृताच्या ‘या’ फोटोला  मिळत आहे लाईक्स आणि कमेंट  

मुंबई : वृत्तसंस्था – अमृता खानविलकरने सतत आपल्या  सौंदर्य, अभिनय,फॅशन, आणि नृत्याने  तिने आपल्या प्रेक्षकांच्या मनावर  सतत मोहिनी घातली आहे. प्रेक्षक ही नेहमी तिच्या या अदा आणि स्टाईलवर फिदा होत असतात.  सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असलेली अमृता सतत आपले स्टायलिश आणि  फॅशनेबल फोटो आणि सेल्फी आपल्या चाहत्यांसोबत नेहमीच शेअर करत असते .
नुकतेच अमृताने एक फोटो शूट केले त्यातलेच काही खास फोटो अमृताने सोशल मीडियावर शेअर केले  आणि नेहमी प्रमाणेच तिच्या चाहत्यांकडून  या फोटोंना  भरभरून लाईक्स मिळाले आहे. नुकत्याच तिने शेअर केलेल्या फोटोशूट मधल्या एका फोटोला  चाहत्यांकडून प्रचंड लाईक्स आणि कमेंट्स मिळत आहे.
 अमृताचा एथनिक अंदाजामधील हा फोटो सध्या तिच्या फॅन्समध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. ब्लॅक आणि ब्राऊन कॉम्बिनेशनमधील साडी आणि ब्लाऊजमध्ये अमृताचे सौंदर्य आणखीनच खुलून गेले आहे. नेहमीप्रमाणे आपली अदा, सौंदर्य, फॅशन, स्टाइल आणि चेहऱ्यावरील प्रचंड आत्मविश्वास अमृताच्या या फोटोमध्ये पाहायला मिळत आहे.
अमृता लवकरच ‘पॉन्डेचेरी’ या सिनेमातून रसिकांच्या भेटीला येणार आहे. सचिन कुंडलकर या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहेत. कुंडलकर आणि तेजस मोडकने या सिनेमाची कथा लिहली आहे. या सिनेमाची कथा नेमकी काय हे अजून कळलेले नाही  मात्र सिनेमाची तगडी स्टारकास्ट रसिकांना आकर्षित करेल. कारण यात अमृता खानविलकरसह सई ताम्हणकर आणि वैभव तत्ववादी  यांच्या प्रमुख भूमिका आहेत.