स्मिता पाटीलच्या बहिणीकडून भेट मिळाल्यानं मराठमोळी अभिनेत्री अमृता सुभाष ‘भावुक’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – आसामच्या गुवाहाटीमध्ये काही दिवसांपूर्वीच फिल्मफेअर अवॉर्ड सोहळा पार पडला. हिंदी चित्रपट सृष्टीत हा अवॉर्ड अत्यंत मानाचा समजला जातो. या ६५ व्या फिल्मफेअर सोहळ्यात अमृता सुभाष या मराठी अभिनेत्रीला गौरविण्यात आले. स्मिता पाटील यांच्या बहीण अनिता पाटील यांनी दिलेल्या भेटीमुळे अभिनेत्री अमृता सुभाष झाल्या भावुक. अनिता पाटील यांनी अमृताला स्मिता पाटील यांची एक ओढणी भेट म्हणून दिली.

अभिनेत्री अमृता सुभाषला गल्ली बॉय चित्रपटासाठी उत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आलं. अमृता सुभाषने गल्ली बॉय चित्रपटात अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री आलिया भट्ट यांच्या सोबत चित्रपटात काम केले होते. या चित्रपटात दोन दिग्गज कलाकार असून देखील तिने आपल्या अभिनयाची छाप प्रेक्षकांवर पाडली होती. स्मिता पाटील यांच्या बहिणीने दिलेली भेट पाहून अमृता भावुक झाली आणि तिने तिच्या भावना ट्विटरवर शेअर केल्या आहेत.