‘कोरोना’पासून लोकांना वाचवण्यासाठी आता Amul नं लॉन्च केली हळदी आयस्क्रीम

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गुजरात सहकारी मिल्क मार्केटिंग फेडरेशन लिमिटेड (GCMMF) अंतर्गत कार्यरत असणाऱ्या अमूलने कोरोना महामारी काळात इम्युनिटी बूस्टर म्हणून हळदी आईस्क्रीम बाजारात आणली आहे. १२५ मिली पॅकची किंमत ४० रुपये असेल. या आईस्क्रीममध्ये हळदी व्यक्तिरिक्त काळी मिरी, मध, खजूर, बदाम आणि काजू यासारखे ड्रायफ्रुटस देखील आहेत, असा अमूलचा दावा आहे.

अमूलने ट्विट करून ग्राहकांना हे सांगितले आहे. कंपनीने ट्विटमध्ये लिहिले आहे की, आपल्याला या आईस्क्रीमचा आनंद मिळेल तसेच ही आपल्या आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. त्यात बऱ्याच फायदेशीर सामग्रीचा वापर करण्यात आला आहे. जसे हळद, बदाम, दूध, मध. हळदीचे दूध आणि आईस्क्रीम या दोन्हींच्या गुणांची मजा एकत्र घ्या. हळदी आईस्क्रीमला उत्तर आणि पश्चिम भारतातील कंपनीच्या अत्याधुनिक उत्पादनाच्या कारखान्यांमध्ये पॅक केले जात आहे.

याअगोदर एप्रिलच्या सुरूवातीला अमूल ब्रँडने इम्युनिटी बूस्टर बेव्हरेजेस रेंज अंतर्गत हळदीचे दूधही बाजारात आणले आहे. २०० मिली दुधाच्या बाटलीची किंमत ३० रुपये आहे. याशिवाय त्यांनी अमूल तुळस दूध, अमूल आले दूध आणि अमूल अश्वगंधा दूधही बाजारात आणले आहे.

पंचामृतही आणले आहे बाजारात
जुलैमध्ये अमूलने पंचामृत लाँच केले होते. पंचामृत मध, साखर, दही, गाईचे दूध आणि तूप या ५ घटकांचे मिश्रण असते. अमूल पंचामृत १० मिलीच्या सिंगल सर्व्हर पॅकमध्ये विकले जात आहे.

मागील वर्षी अमूलने लाँच केले होते कॅमल मिल्क
उंटाचे दूध पचनात सोपे आहेच, पण त्याचे इतरही बरेच फायदे आहेत. त्यात इन्सुलिन प्रथिने जास्त प्रमाणात असल्याने मधुमेह असलेल्या लोकांसाठी फायदेशीर ठरते. उंटाचे दूध विविध संस्कृतीत हजारो वर्षांपासून वापरले जात आहे. आरोग्याचे विविध फायदे पाहता या दुधामुळे बाजारात एक नवीन क्षेत्र उघडले आहे.