Covid-19 : Amul नं लाँच केलं हळदी दूध, रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास करेल ‘मदत’

नवी दिल्लीः वृत्तसंस्था – सध्या कोविड -19 साथीच्या काळात स्वतःचे रक्षण करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे तुमची प्रतिकारशक्ती सुधारणे. आयुष मंत्रालयाने देखील भारतीयांना साथीच्या आजारांपासून वाचवण्यासाठी रोग प्रतिकारशक्तीची पातळी वाढवण्यासाठी घरगुती उपचारांचा अवलंब करण्याचे आवाहन केले आहे. देशभरातील ग्राहकांना रेडी टू ड्रिंक पर्याय उपलब्ध करुन देण्यासाठी अमूलने स्वस्त किंमतीमध्ये असलेले हळद दूध आणले आहे. कंपनीचा असा दावा आहे की, शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्याचा हा एक सोपा मार्ग आहे.

हळद असलेले दूध किंवा सोनेरी दुध त्याच्या बॅक्टेरियाच्या प्रतिरोधनासाठी ओळखले जाते. आयुर्वेदात हळदीचा उपयोग चांगल्या आरोग्यासाठी देखील केला जातो. अमूलने हळदीच्या औषधी गुणधर्मांसह त्याच्या समृद्ध आणि मलईयुक्त प्रमाणित अमूल दुधासोबत मिळून याला एक उत्कृष्ट प्रतिकारशक्ती बूस्टर पेय बनवले आहे.

अमूल हळद असलेले दूध स्वादिष्ट आहे आणि ते केशर आणि बदाम फ्लेवर्ससह येते. हे पेय दिवसाच्या कोणत्याही वेळी कोणत्याही वयोगटातील ग्राहक नियमितपणे घेऊ शकते. 200 मिली पॅकमध्ये उपलब्ध असलेल्या अमूल हळद दुधाची किंमत 30 रुपये आहे. बुधवारीपासून सर्व अमूल पार्लर व किरकोळ स्टोअरमध्ये अमूल हळदीचे दूध उपलब्ध केले गेले आहे.

अमूल हळदी दुध हे पश्चिम आणि उत्तर भारतातील अत्याधुनिक उत्पादक प्रकल्पांमध्ये भरले जाते आणि सध्या कंपनीने दररोज 2,00,000 पॅक उत्पादन क्षमतासह प्रारंभ केला आहे. अमूलने प्रदीर्घ नैसर्गिक आणि निरोगी पेय पदार्थांचे उत्पादन केले असून कंपनी लवकरच बाजारात आले दूध, तुळशीचे दूध इत्यादी बाजारात लॉंच करणार आहे.

रेडी-टू-ड्रिंक पदार्थात प्रचंड स्पर्धा असूनही अमूलने विविध पॅकेजिंग, पॅक आकार आणि किंमत गुणांमध्ये मूल्य एडेड दूध पेय सादर करुन आपले नेतृत्व कायम राखले आहे.