Amul Milk झाले महाग, ग्राहकांना उद्यापासून द्यावी लागेल वाढलेली किंमत, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  Amul Milk साठी आता ग्राहकांना जास्त किंमत चुकवावी लागेल. कंपनीने देशभरात अमूल दूधाच्या किंमतीत वाढ करण्याची घोषणा केली आहे. कंपनीने बुधवारी सांगितले की, एक जुलैपासून देशभरात Amul Milk 2 रुपये प्रति लीटर महाग मिळेल. गुजरात सहकारी दुग्ध पणन महासंघ (GCMMF) च्या एका वरिष्ठ अधिकार्‍याने बुधवारी ही माहिती दिली. पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढल्याने जनावरांचे खाद्य महागले आहे, तसेच दूधाचा वाहतूक खर्च आणि इतर खर्च वाढल्याने ही दरवाढ होत आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

अधिकार्‍याने म्हटले की, जवळपास एक वर्ष आणि सात महिन्याच्या कालावधीनंतर किंमतीत वाढ केली जात आहे.
उत्पादन खर्चातील वाढीमुळे किंमती वाढवणे आवश्यक झाले होते.

अमूल ब्रँडच्या दूध आणि डेयरी प्रॉडक्टचे पणन करणार्‍या जीसीएमएमएफचे व्यवस्थापकीय संचालक आरएस सोढी यांनी म्हटले,
अमूल दूधाच्या किंमतीत उद्यापासून संपूर्ण भारतात 2 रुपये प्रति लीटरची वाढ केली जाईल.
नवीन किंमती सर्व अमूल दूध ब्रँड जसे की, गोल्ड, ताजा, शक्ती, टी-स्पेशलसोबतच गाय आणि म्हैशीच्या दूधावर लागू होतील.

सोढी म्हणाले, खाद्य महागल्याने दूधाच्या किंमतीत वाढ करणे आवश्यक झाले होते.
तसेच पॅकेजिंक खर्चात 30 ते 40 टक्के, वाहतूक खर्चात 30 टक्के आणि वीज खर्चात 30 टक्केची वाढ झाली आहे, यामुळे इनपुट खर्चात वाढ झाली आहे.

उद्यापासून ग्राहकांना अमूलच्या फुल क्रीम दूधाच्या एक लीटर पॅकसाठी 57 रुपये द्यावे लागती
तर, ग्राहकांना फुल क्रीम दूधाच्या अर्धा लीटर पॅकसाठी 29 रुपये द्यावे लागतील.
गुजरात सहकारी दुग्ध पणन महासंघाने सांगितले की,
देशभरात अमूलच्या सर्व ब्रँडवर किंमतीत वाढ होईल.
यामुळे आता ग्राहकांना दूधासाठी जास्त पैसे चुकवावे लागतील.

Web Title : amul milk becomes expensive prices of amul milk will be increased by rs 2 per litre with effect from july1

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Google चा मोठा खुलासा ! ‘OK Google’ बोलल्यानंतर कंपनीचे कर्मचारी ऐकतात तुमचं बोलणं