‘गोंडस’ मुलासोबत एमी जॅक्सनची ‘मस्ती’, न्यू मम्मीच्या ‘फिटनेस’नं सर्वांचच ‘लक्ष’ वेधलं

पोलीसनामा ऑनलाइन टीम – बॉलिवूड अभिनेत्री एमी जॅक्सनसाठी 2019 हे आनंदाचे वर्ष होते. एमीने 23 सप्टेंबर रोजी एका गोंडस मुलाला जन्म दिला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे लग्नाआधी एमी आई बनली आहे. एमीने गेल्या वर्षी जानेवारीत जॉर्जबरोबर एंगेजमेंट केली होती. दोघेही लिव्ह इन पार्टनर आहेत. या जोडप्याने आपल्या मुलाचे नाव एंड्रियास ठेवले आहे. एमी सध्या आपल्या मुलाची काळजी घेण्यात व्यस्त आहे. ती नेहमी मुलासोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

अलीकडे एमीने तिच्या इन्स्टाग्रामवर आपल्या मुलासोबतचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती आपल्या मुलासोबत मस्ती करताना दिसत आहे. या फोटोत एमी रेड कलरच्या मोनोकनीमध्ये दिसत आहे. त्याचबरोबर तिचा लाडका मुलगा रेड शॉर्ट्समध्ये दिसत आहे.

https://www.instagram.com/p/B54n23lpHod/

https://www.instagram.com/p/B5pKurjpP2_/

एका फोटोत एमी झाडावर झोपून पोज देत आहे. हा फोटो समोर येताच तिच्या फिटनेसविषयी चाहत्यांमध्ये बरीच चर्चा रंगत आहे. एमीनेही खूप कमी वेळात आपले फिगर मेटेंन ठेवले आहे. बाळांच्या जन्मानंतर एमीने खूपच कमी वेळात स्वतःला फिट केले आहे.

https://www.instagram.com/p/B1yZcXjJ3Vv/

https://www.instagram.com/p/B0IhsPupUE5/

गरोदरपणातही एमी सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह होती आणि तिचे बेबी बंप फोटो चाहत्यांसह शेअर करायची. तिच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे म्हणले तर एमीने आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात 2010 मध्ये केली होती. यानंतर तिने ‘एक दिवाना था’, ‘सिंग इज ब्लींग’, ‘फ्रिकी अली’ यासारख्या बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम करुन यश मिळविले आहे. बॉलिवूड व्यतिरिक्त अ‍ॅमी जॅक्सनने तामिळ, तेलगू आणि कन्नड चित्रपटांमध्येही काम केले आहे.

https://www.instagram.com/p/BxPP2K9ht2y/

https://www.instagram.com/p/BhmV0XcDQjU/