बॉलिवूडची ‘ही’ हॉट अभिनेत्री लग्नाआधीच प्रेग्नेंट

मुंबई : वृत्तसंस्था- बॉलिवूडच्या हॉट अभिनेत्रींपैकी एक म्हणून एमी जैक्सन हिचे नाव घेतले जाते. ती बॉयफ्रेंड आणि ब्रिटिशचा मल्टी मिलेनियर जॉर्ज पानायियोटौ याच्यासोबत याचवर्षी ग्रीसमध्ये ती लग्न करणार होती. ब्रिटीश ब्युटी म्हणून प्रसिद्ध असलेल्या एमी जॅक्सनने नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी साखरपुडा केल्याची खुशखबर सोशल मीडियावर चाहत्यांसह शेअर केली होती. आता मात्र तिने एक गोड बातमी देत तिच्या फॅन्सना खुश केले आहे. ती बातमी म्हणजे ती गरोदर असल्याचे सांगून तिने एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. रोबोट, 2.0, सिंग इज ब्लिंग अशा गाजलेल्या चित्रपटांमध्ये तिने काम केले आहे.

एमी आणि जॉर्ज हे गेल्या दोन वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. जानेवारी महिन्यांत त्यांनी साखरपुडाही केल्याचे जाहीर केले होते. जॉर्ज हा लंडनमधील प्रसिद्ध बिल्डर अंद्रेस पानायीओतो यांचा मुलगा आहे. तसेच त्याने स्वत:ची द अॅबिलीटी ग्रुप नावाची कंपनी देखील सुरू केली आहे. कंपनी अंतर्गत त्याची अनेक पंचतारांकीत हॉटेल्स आहेत. एमीने नवीन वर्षांच्या संध्येला बॉयफ्रेड जॉर्जसोबत तिने साखरपुडा केला होता. त्यावेळी ती दोन महिन्यांची प्रेगनंन्ट होती.

तिचे लग्न आता पुढच्या वर्षी २०२० मध्ये होणार असल्याची माहिती समोर येत आहे. लग्न पुढे ढकलण्याचे कारणही थोडे आश्चर्यकारक आहे. लग्न करण्यासाठी सुंदर बीचच्या शोधात हे कपल आहे. जेव्हा दोघांना त्यांच्या आवडीनुसार बीच मिळेल तेव्हा ते लग्न करतील अशा चर्चा सुरू आहेत. जॉर्जचा ‘क्वीन सिटी’ नामक एक अलिशान नाईटक्लबही आहे. एमीला डेट करण्यापूर्वी जॉर्ज पॉप गायिका शेरिल कोलला डेट करत होता. पण कालांतराने दोघांचेही ब्रेकअप झाले आणि जॉर्जला एमी मिळाली.