आई होणार न्यूझीलंडची ‘ही’ खेळाडू, महिला सहकाऱ्याबरोबर केलं होतं लग्न

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – न्यूझीलंडच्या महिला क्रिकेट संघाची कर्णधार एमी सैटरथवेट लवकरच आई बनणार असून 2017 मध्ये तिने आपली समलैंगिक पार्टनर ली ताहुहू हिच्याशी विवाह केला होता. तिने आपण गर्भवती असल्याची घोषणा एका अनोख्या प्रकारे केली.

तिने ट्विटरवर एक फोटो ट्विट करत म्हटले कि, ली आणि मला हा आंनद तुमच्याबरोबर वाटताना खूप आनंद होत आहे. पुढील वर्षीच्या सुरुवातीला मी आमच्या मुलाला जन्म देणार आहे. मी किती आनंदी हे मी शब्दात सांगू शकत नाही. त्यानंतर तिची पार्टनर ली ताहुहू हिने ते ट्विट रिट्विट करत लिहिले कि,आम्ही आता दोनाचे तीन होणार आहोत. या फोटोखाली जानेवारी 2020 असे लिहिण्यात आले असून लहान मुलाचे कपडे देखील दिसत आहेत. खूप वर्षांपासून नात्यात राहिल्यानंतर या दोघींनी 2014 मध्ये साखरपुडा केला होता. त्यानंतर 2017 मध्ये त्यांनी लग्न केले होते. त्यावेळी हे लग्न खूप चर्चेत आले होते.

दरम्यान, न्यूझीलंडमध्ये 2013 मध्ये समलैंगिक विवाह कायद्यास मंजुरी देण्यात आली होती. त्यामुळे आता एमी सैटरथवेट हि पहिली अशी खेळाडू असेल जिला मॅटर्निटी सुट्ट्यांबरोबरच वेतन देखील मिळणार आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like