अभिनेत्री अमायरा दस्तूरनं ‘HOT’ फोटोशुट करत दिली इतर अभिनेत्रींना ‘टक्कर’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड स्टार अमायरा दस्तूरनं नवीन फोटोशुट केलं आहे ज्यामुळे ती चर्चेत आली आहे. या नव्या फोटोशुटमध्ये अमायरा बिकीनी लुकमध्ये खूपच बोल्ड अवतारात दिसत आहे. सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या अमायरानं नव्या फोटोशुटमधील हॉट फोटो सोशलवर शेअर केले आहेत. सध्या सगळीकडं अमायराच्या या हॉट फोटोंची जोरदार चर्चा होताना दिसत आहे.

बिकीनीतले फोटो शेअर करण्याची ही अमायराची काही पहिलीच वेळ नाही. सध्या समोर आलेल्या फोटोंमध्ये अमायरा अनेक सेक्सी अंदाजातील पोज देताना दिसत आहे. अमायरा बोल्ड फोटोंसाठी फेमस आहे. अमायराचे हे फोटो सध्या सोशलवर व्हायरल होताना दिसत आहेत.

अमायरा मीटू मोहिमेदरम्यान चर्चेत आली होती. पुरुष आणि महिला अशा दोघांच्याही लैंगिक शोषणाची शिकार झाल्याचा धक्कादायक खुलासा तिनं केला होता. अमायरा म्हणाली होती की, “मी पुरुष आणि महिला दोघांच्याही लैंगिक शोषणाची शिकार झाले आहे. मी त्यांची नावे जगजाहीर नाही करू शकत. त्यांचं नाव जगासमोर सांगण्याची हिंमत माझ्यात नाही. ते इंडस्ट्रीतले पावरफुल व्यक्ती आहेत. मी कास्टींग काऊचला बळी पडले नाही. मी बॉलिवूड आणि साऊथ अशा दोन्ही इंडस्ट्रीत अत्याचार सहन केला आहे. एक दिवस मी नक्कीच याचा खुलासा करेन. मला सुरक्षित वाटत नाही तोवर मी कोणाकडेही बोट दाखवणार नाही.”

अमायराच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर नुकतीच ती मेड इन चायना सिनेमात दिसली होती. मनिष तिवारीचा सिनेमा इस्सक मधून अमायरानं आपल्या करिअरला सुरुवात केली होती. या सिनेमात ती प्रतीक बब्बर सोबत काम करताना दिसली होती. अमायरानं 13 व्या वर्षी मॉडेलिंगला सुरुवात केली होती. अमायरानं अनेक कमर्शियल अॅडमध्येही काम केलं आहे. काही महिन्यांपूर्वी आलेल्या संजय दत्तच्या प्रस्थानम या सिनेमातही तिनं काम केलं आहे.