Coronavirus : सोशल डिस्टन्सिंग – एक मीटर पेक्षा जास्त अंतर कमी होताच वाजेल ‘अलार्म’

उत्तर प्रदेश : वृत्तसंस्था – कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी छर्रा येथील बी.टेकच्या विद्यार्थ्याने सोशल डिस्टंसिंगचे पालन करण्यासाठी ‘सोशल डिस्टेंसिंग अलार्म’ तयार केला आहे. दोन व्यक्तींमधील सोशल डिस्टंसिंगचे उल्लंघन झाल्यास हा गजर वाजण्यास सुरु होईल. हे यंत्र लोक गळ्यात आयडी कार्डसारखे देखील परिधान करू शकतात.

एक मीटर कमी अंतरावर दुसरी व्यक्ती येताच अलार्म तोपर्यंत वाजेल, जोपर्यंत दुसरी व्यक्ती दूर होत नाही. उपायुक्त उद्योग केंद्राला हा सोशल डिस्टंसिंग अलार्म आवडला आहे आणि त्यांनी याचा एक व्हिडिओही घेतला आहे जेणेकरुन तांत्रिक मान्यतेसाठी तो पुढे पाठवता येईल.

छर्रा शहरातील मोहल्ला हलवाईयान येथील नगर पंचायत सदस्य प्रतिनिधी राजीव अग्रवाल यांचा मुलगा श्रेय अग्रवाल जालंधरमधील एका विद्यापीठात बीटेक इलेक्ट्रिक प्रथम वर्षाचा विद्यार्थी आहे. त्यांनी जयपूर येथील आपला मित्र पीयूष काछवाल यांच्यासमवेत मार्चमध्ये ‘माझ्या सरकारचे कोविड १९ समाधान चॅलेंज’च्या ऑनलाइन परीक्षेत भाग घेतला होता. पीयूष काछवाल यांच्यासह हा अलार्म कवच सादर केला होता, ज्यामध्ये या यंत्राचे खूप कौतुक झाले होते.

श्रेय अग्रवाल याच्या म्हणण्यानुसार, हे उपकरण तयार करण्यासाठी साहित्य आवश्यक होते, त्यासाठी उपायुक्त उद्योग केंद्र श्रीनाथ पासवान यांनी सामान आणण्यासाठी पास मिळवण्यात मदत केली. हे उपकरण तयार करण्यापूर्वी सीडीओ आणि डीएम यांचीही भेट घेतली होती.

सीडीओने व्हाट्सएपच्या माध्यमातून यंत्राची कागदपत्रे मागितली होती, यानंतर १० मे रोजी उपकरण घेऊन येण्यास परवानगी दिली होती. श्रेय अग्रवालच्या म्हणण्यानुसार हे अलार्म कवच एक मीटरपासून चार मीटरच्या अंतरापर्यंत तयार केले जाऊ शकते.

सोमवारी दुपारी उपायुक्त उद्योग केंद्राचे अध्यक्ष श्रीनाथ पासवान यांनी श्रेय अग्रवालला बोलावून अलार्म कवच पाहिले. हा अलार्म त्यांना आवडला. त्याचा संपूर्ण व्हिडिओ त्यांनी श्रेय अग्रवालकडून घेतला आहे.