12 तासानंतर ‘तो’ विहीरीत पडल्याचं समजलं, पुण्याहून औरंगाबादकडे जाणाऱ्यामुळं ‘जीवन’दान

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – नेवासा तालुक्यातील एका हॉटेलशेजारी असलेल्या पडीक विहिरीत काल रात्री दहा वाजता दारुच्या नशेत युवक पडला. आज दुपारी बारा वाजता त्याचा आवाज ऐकून विहिरीत कुणीतरी असल्याचे पुण्याहून औरंगाबादकडे जाणाऱ्या एका व्यक्तीला समजले. त्यानंतर नागरिकांनी त्या युवकाची सुखरूप सुटका केली.

याबाबत समजलेली माहिती अशी की, नेवासा तालुक्यातील उस्थळ येथील दिपक वामन भदगले (वय२२) हा रविवारी रात्री दहा वाजता दारूच्या नशेत नगर-औरंगाबाद महामार्गावरील हॉटेल परमवीरच्या शेजारी कर्डीले यांच्या मोकळ्या जागेत असलेल्या २० फूट विहिरीत पडला. सुदैवाने विहिरीत पाणी कमी असल्याने तो काठावर एका लाकडाचा आधार घेऊन बसला. रस्त्यापासून विहीर लांब असल्याने व परिसर पडीक असल्याने कोणीही विहिरीकडे फिरकले नाही. त्यामुळे भदगले हे आत अडकल्याचे लक्षातच आहे नाही.

आज दुपारी १२ वाजता पुणे येथील संजय चव्हाण हे औरंगाबादहून पुणेकडे जाताना परमवीर हॉटेलवर
जेवनासाठी थांबले होते. चव्हाण हे लघुशंकेसाठी शेजारील मोकळ्या पडीक जमिनीकडे गेले. त्यांना विहिरीतून ‘कोणी आहे का, मला वाचवा’, असा आवाज आला. आवाज ऐकून चव्हाण हे पुढे गेले. त्यांनी आवाजाच्या दिशेने जाऊन विहिरीमध्ये डोकावून पहिले, त्यावेळी विहिरीत अडकलेला व आतील लाकडावर बसलेला युवक आढळून आला. त्यांनी ताबडतोब सोबत असलेल्या मित्रांना बोलावून घेतले. हॉटेलवरून दोर घेऊन इतर नागरिकांच्या मदतीने त्या युवकाला विहिरीतून सुखरूप बाहेर काढले.

आरोग्यविषयक वृत्त –

गांज्याच्या बीया’ आरोग्यासाठी अत्यंत लाभदायी, दूर होतात ‘हे’ ९ आजार

बटाटे, पालकसह ‘या’ ७ पदार्थांना पुन्हा गरम करू नका, होऊ शकतात ‘हे’ आजार

द्राक्ष खा आणि कँसरची भिती सोडून द्या, आहारात समाविष्‍ट करा ‘हे’ १० पदार्थ

शरीराला आतून सशक्त बनवतो आवळा, ‘हे’ आहेत खास १० फायदे

गरोदरपणात महिलांनी करू नयेत ‘या’ ६ चुका, बाळासाठी आहे धोकादायक!

गॅस आणि ‘या’ ९ समस्या दूर करणारा नंबर वन आहे ‘हा’ ज्यूस, एकदा नक्की घ्या

कोणत्‍या आजारांपासून वाचण्‍यासाठी कोणती फळे खावीत, जाणून घ्‍या