पुण्यात मद्यधुंद तरुणीचा रस्त्यातच ‘राडा’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – बावधन येथील रामनगर परिसरात एका मद्यधुंत तरुणीने सोसायटीच्या गेटजवळ काही गाड्यांना धडक दिली. यानंतर तिने पार्क केलेल्या एका कारला वारंवार ठोकर देत मोठ्या प्रमाणात नुकसान केले. एवढेच नाहीतर त्या ठिकाणी जमा झालेल्या नागरिकांच्या अंगावर गाडी घालण्याची धमकी दिली. नागरिकांनी याची माहिती पोलिसांना दिल्यावर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, तिने कपडे काढण्याची धमकी दिल्यानंतर पोलिसांना तेथून काढता पाय घ्यावा लागला.

स्वाती सौरक्ष मिश्रा (रा. रामनगर कॉलनी, बावधन) असे या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहेत. तर दर्श सुभाष चावला (वय-२८ रा. बावधन) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. तरुणीने चक्क पोलिसांना भर रस्त्यात कपडे काढायची धमकी देत पोलिसांवर अश्लील शेरेबाजीही केल्याचे समोर आले आहे.

स्वाती तिच्या डस्टर गाडीने मंगळवारी पहाटेच्या सुमारास घरी आली. सोसायटीच्या गेटजवळ एक नॅनो कार पार्क केली होती. स्वातीने सोसायटीत प्रवेश करताना नॅनोला धडक दिली. त्यानंतर तिने वारंवार नॅनो कारला धडक दिली. या घटनेमुळे सोसायटीमधील नागरिक जमा झाले. तिने त्यांच्यावर देखील गाडी घालण्याची धमकी देत गोंधळ घातला. दरम्यान, सोसायटीमधील नागरिकांनी याची माहिती पोलिसांना दिली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असता तिने पोलिसांना कपडे काढण्याची धमकी देत शिवीगाळ केली. पोलिसांनी स्वातीवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात तिच्यावर मानसोपचार सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. पुढील तपास पोलीस उप निरीक्षक आर.आर. दिवटे करीत आहेत.

आरोग्यविषयक वृत्त –