Coronavirus : ‘कोरोना’च्या दहशतीमुळं खोकलणं देखील झालय गुन्हा, एकावर दाखल झाला FIR

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरसबद्दल संपूर्ण जगात अशी भीती निर्माण झाली आहे जसे की, खोकला देखील एक गुन्हा बनला आहे. अमेरिकेच्या न्यू जर्सीच्या शहरात एका व्यक्तीविरूद्ध आतंकवादी धोक्याचा आरोप दाखल करण्यात आला आहे कारण त्याने एका सुपरमार्केटमध्ये जाऊन कर्मचाऱ्यासमोर खोकला होता. खोकल्यानंतर त्याने सांगितले की, त्याला कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. यानंतर न्यू जर्सीच्या प्रशासनाने त्याच्यावर आतंकवादी धोक्याचा आरोप दाखल केला आहे.

रॉयटर्सकडून असे सांगितले जात आहे की, 50 वर्षांच्या जॉर्ज फाल्कनवर आतंकवादी धोक्याचा आरोप करण्यात आला आहे. यासह त्याच्यावर अधिक दंड आकारला असून न्यू जर्सी येथील अटार्नी जनरल कार्यालयाने याची पुष्टी केली आहे.

रॉयटर्सने याबाबत फाल्कन याच्याशी चर्चा केली तेव्हा त्याने फेसबुक संदेशाद्वारे आपल्यावरील आरोप फेटाळून लावले. तो म्हणाला की, मी कोणासमोर खोकलो नाही त्याचबरोबर कोरोनो व्हायरसबद्दल काहीही सांगितले देखील नाही.

जॉर्ज फाल्कन वेगमॅंस सुपरमार्केटमध्ये गेला होता, असे अटर्नी जनरल ग्रेवाल यांच्याकडून नजुरसी यांना सांगितले आहे. रविवारी संध्याकाळी जॉर्ज सुपरमार्केटमध्ये गेला आणि खाण्यापिण्याच्या वस्तुजवळ उभा होता. सुपरमार्केटच्या एका कर्मचाऱ्याने त्याला दूर राहण्यास सांगितले. जॉर्ज दूर जाण्याऐवजी त्या कर्मचाऱ्यावर खोकला. यानंतर, त्याला कोरोना व्हायरसची लागण झाल्याचे सांगत तो हसला.

यानंतर, फाल्कन सुपरमार्केटच्या आणखी दोन कर्मचार्‍यांकडे गेला आणि त्यांना सांगितले की, तुम्ही नशीबवान आहात कारण तुमच्याकडे नोकरी आहे. पोलिसांनी घटनेच्या संदर्भात सुरुवातीला त्यांच्याशी संपर्क साधला असता त्याने आपली ओळख सांगण्यास नकार दिला.

मंगळवारी न्यू जर्सीचे राज्यपाल फिल मर्फी यांनी जॉर्जवर लावलेल्या आतंकवादी धोक्याच्या आरोपाच्या प्रकरणाची माहिती दिली. ते म्हणाले की, कायद्याचे पालन करणे आणि व्हायरसच्या संसर्गास गंभीरपणे घेण्यासाठी एजंन्सीने सक्ती दाखवणे आवश्यक आहे.

अमेरिकेत कोरोना व्हायरसच्या संसर्गाची 50 हजार प्रकरणे समोर आली आहेत. व्हायरसमुळे 640 लोक मरण पावले आहेत. न्यूयॉर्कमध्ये यूएस संसर्गाच्या फक्त एक तृतीयांश रुग्णांची नोंद झाली आहे.