‘या’ ठिकाणी होते ‘ब्लॅक डायमंड अ‍ॅपल’ ची शेती !

दिल्ली : वृत्तसंस्था – मानवाच्या शरीराला जशी अन्नाची गरज असते तशीच रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी फळांची गरज ही असते. काही आजारांना दूर ठेवण्यासाठी डॉक्टरांकडून सल्ला देण्यात येतो, दररोज एक तरी फळ खा ! वेगवेगळ्या सीजन मध्ये वेगवेगळी फळ उपलब्ध असतात.

त्या फळांची खासियत ही तशीच वेगवेगळी असते.सगळ्या सीजन मध्ये उपलब्ध असणारे आणि बहुतेक जणांचे  आवडीचे फळ  सफरचंद असते. यातील बहुतेक सफरचंद लाल, हिरवे आणि पिवळ्या रंगाचे आपण पाहिले आहे. मात्र तिबेट मध्ये काळ्या  रंगाचे सफरचं पिकवले जाते. गडद पर्पल रंगाच्या या सफरचंदाला ‘ब्लॅक डायमंड अ‍ॅपल’ असेही ओळखले जाते.

या प्रकारचे सफरचंद जगात केवळ एकाच ठिकाणी म्हणजे तिबेटमध्ये पिकविले जाते. तेथे स्थानिक भाषेत या काळ्या सफरचंदाला ‘हुआ नियु’ असे म्हटले जाते. तिबेटमध्ये समुद्र पातळीपासून सुमारे ३१०० मीटर उंचावर या सफरचंदाची शेती केली जाते. शेतकर्‍यांसाठीसुद्धा हे फळ ‘ब्लॅक डायमंड’पेक्षा कमी नाही. कारण आधुनिक तंत्रज्ञानाच्या आजच्या काळात सर्व प्रकारची माहिती इंटरनेटवर उपलब्ध होते. मात्र, तेथेही या सफरचंदाची जास्त माहिती उपलब्ध नाही. ज्या उंचीवर हे फळ पिकविले जाते तेथे दिवसा आणि रात्रीचे तापमान वेगवेगळे असते. हे एक दुर्लभ  प्रकारचे सफरचंद आहे.
दिवसा या फळाला भरपूर सूर्यप्रकाशाबरोबरच अल्ट्रा व्हायोलेट किरणेही मिळतात. या किरणामुळे त्यांचा रंग गडद पर्पल होतो. ब्लॅक डायमंड अ‍ॅपलच्या शेतीस २०१५ पासून सुरुवात झाली असून एका फळाची किंमत ५०० रुपयांपेक्षा जास्त असते.