शिरुरच्या सरदवाडी येथे एटीएम फोडुन 73 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला

शिक्रापुर : प्रतिनिधी –   पुणे-अहमदनगर महार्गावर सरदवाडी(ता.शिरुर) येथे चोरट्यांनी एटीएम फोडुन सुमारे ७३ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेल्याची घटना घडली आहे.

याबाबत शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,पुणे-अहमदनगर महामार्गालगत सरदवाडी(ता.शिरुर) येथे टाटा इंडिकॅश कंपनीचे एटीएम आहे.(दि.२१) रोजी पहाटे चोरट्यांनी सदर ठिकाणी असणारे एटीएम गॅस कटर च्या सहाय्याने एटीएमचे सेफ्टी डोअर फोडुन त्यातील त्यामधील ७३ हजार ९०० रुपयांची रक्कम चोरटयांनी चोरुन नेली आहे.याबाबत महेश आदीनाथ भारती यांनी शिरुर पोलिस स्टेशनला फिर्याद दिली आहे.या प्रकरणी शिरुर पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असुन पुढील तपास शिरुर पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक गणेश जगदाळे हे करत आहेत.

शिरुर परिसरात चो-यांचे प्रमाण वाढले

शिरुर शहर व परिसरात लॉक डाउन उठल्यानंतर पुन्हा चो-यांचे सञ सुरु झाले आहे.या मध्ये दुचाकी चो-या तसेच भुरट्या चो-यांचे प्रमाण मोठे असुन या चो-या थांबवण्यासाठी राञगस्त वाढवण्याची मागणी नागरिकांकडुन केली जात आहे.

You might also like