सरपंच महिलेचा गळा आवळून खुन करण्याचा प्रयत्न

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाइन – माहेराहुन दोन कोटी रूपये आणावेत आणि परस्त्री सोबत असलेल्या संबंधाची विचारणा केली म्हणून गहुंजे गावच्या सरपंच पत्नीचा पतीने गळा दाबून खून करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. हिंजवडी पोलिसांनी पतीला अटक केली आहे.

याप्रकरणी सरपंच शीतल किरण बोडके (२८) यांनी फिर्याद दिली आहे. तर पती किरण निर्घृन बोडके (३८, रा.भूमकर चौक, वाकड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार किरण याने सरपंच शीतल यांच्याकडे माहेरहून दोन कोटी रुपयांची मागणी करत शारीरिक व मानसिक छळ केला.

तसेच परस्त्रियांशी असलेल्या अनैतिक संबंधा बाबत पत्नी शीतल यांनी विचारणा केली असता किरण याने त्यांना वारंवार मारहाण केली. बुधवारी (दि.१९) रोजी रात्री या दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. यावेळी चिडलेल्या किरणने ‘तुला मारूनच टाकतो’ असे म्हणत शीतल यांचा गळा दाबून खून करण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार शीतल यांनी दिली. हिंजवडी पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करुन पती किरण बोडके याला अटक केली आहे. तपास हिंजवडी पोलिस करीत आहेत.

आरोग्य विषयक वृत्त

सावधान ! पाय दुखणे हा असू शकतो हार्ट अ‍ॅटॅकचा संकेत

कॅफिनचे अतिसेवन करणे आरोग्यासाठी ठरू शकते धोकादायक

महिलांनो, आकस्मिक गर्भपात झाल्यास अशी घ्या काळजी

निरोगी हृदयासाठी योग्य व्यायाम आणि आहार महत्वाचा