लालबहाद्दूर शास्त्रींचा पुतळाच चोरण्याचा प्रयत्न

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांचा पुतळा चोरण्याचा प्रयत्न काही अज्ञातांनी केल्याचा प्रकार समोर आला आहे. शीवजवळील वाहतुक बेटावर बसविण्यात आलेला शास्त्रीजींचा पुतळा काही जणांनी हलविला. त्यानंतर स्थानिकांनी पाहून आरडाओरडा केल्यावर त्यांनी धूम ठोकली.

२ नोव्हेंबर १९८९ रोजी बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते कुर्ला पश्चिम आणि शीवच्या मध्यभागी असलेल्या वाहतुक बेटावर शास्त्रीजींचा पुतळा बसविण्यात आला होता. शीव ते मुलूंड दरम्यानच्या रस्त्यालाही शास्त्रीजींचे नाव देण्यात आले आहे. सोमवारी रात्री काही अज्ञातांनी हा पुतळा काढला.

त्यानंतर जवळपास कुठेतरी लपविण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून सुरु होता. त्याचवेळी एका स्थानिकाने आरडाओरडा केला. त्यानंतर त्यांनी धूम ठोकली. याची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसानी हा पुतळा पुन्हा तेथेच बसवला आहे.