धक्कादायक ! इमारती आणि इतर बांधकाम कोसळल्याने देशात दररोज ७ जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मुंबई-पुणे सारख्या शहरांमध्ये इमारती कोसळण्याच्या घटना वारंवार घडत असताना नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोच्या एका आकडेवारीमुळे धक्कादायक बाब समोर आली आहे. या आकडेवारीनुसार वर्ष २००१ ते २०१५ दरम्यान देशात इमारती आणि इतर रचनांच्या कोसळण्यामुळे तब्बल ३८,३६३ लोकांचा मृत्यू झाला आहे. यादरम्यान ३७,५१४ इमारती कोसळण्याच्या घटना घडल्या असून दररोज सरासरी ७ व्यक्ती इमारती कोसळण्यामुळे मृत्युमुखी पडतात.

NCRB नुसार हे अकाली मृत्यूचे मोठे कारण

‘अ‍ॅक्सीडेंटल डेथ्स अ‍ॅड सुसाइड इन इंडिया’ या NCRB च्या वार्षिक अहवालात लोकांच्या अकाली मृत्यूची अनेक कारणे विषद केली आहेत. यानुसार विविध रचनांच्या कोसळण्यामुळे लोकांच्या होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण अधिक असून हे एक मोठे कारण असल्याचे म्हटले गेले आहे. यासंदर्भातील आकडेवारीनुसार २००१ ते २०१५ दरम्यान सर्वाधिक घटना २०११ मध्ये घडल्या. यावर्षी देशात ३,१२५ अशा घटना घडल्या.

५ टक्के लोकांनी पुलाच्या कोसळण्यामुळे गमावला जीव

मृत्युमुखी पडलेल्यांपैकी पूल कोसळण्यामुळे मृत झालेल्या लोकांची संख्या देखील मोठी असून ती ५ टक्के इतकी आहे. यासंदर्भातील मृतकांची संख्या स्थिर नसून दरवर्षी वाढत किंवा घटत असल्याचे आकडेवारीतून दिसून येते. या आकडेवारीला NCRB ने ५ प्रकारांमध्ये विभागले असून २००१ ते २०१५ या वर्षांत निवासी इमारती कोसळण्यामुळे १५ हजारहून जास्त मृत्यू झाले तर व्यावसायिक इमारतींच्या कोसळण्यामुळे ३,९८१ लोक मृत्युमुखी पडले. याशिवाय फ्लायओव्हर सारख्या रचना कोसळण्यामुळे ४५ टक्के तर पूल कोसळण्यामुळे ५४५ टक्के लोकांचा मृत्यू झाला.

महिलांपेक्षा पुरुष मृतकांची संख्या दीडपट जास्त

मागील १५ वर्षांमध्ये अशा दुर्घटनांमुळे २७००० पुरुष तर ११००० महिलांना आपला जीव गमवावा लागला. या आकडेवारीनुसार महिलांपेक्षा पुरुषांची संख्या दीडपटीने जास्त आहे. या १५ वर्षांमध्ये केवळ २००१ साली पुरुषानापेक्षा महिला मृतकांची संख्या जास्त होती. ती देखील दीडपट इतकी होती.

देशातील हजारो शालेय इमारतींची अवस्था वाईट

संपूर्ण देशात मोठ्या प्रमाणावर शालेय इमारती अशा आहेत ज्या कधीही कोसळू शकतात. एकट्या मुंबईत अशा ७०० इमारती सरकारने निश्चित केली आहेत. एका सर्वेनुसार संपूर्ण देशात ०.६७ शालेय इमारतींची अवस्था बिकट आहे, ज्यांची संख्या हजारांमध्ये असेल. जर अशा इमारती शोधून काढून लवकरात लवकर उपाययोजना केली नाही तर अशा दुर्घटननांचे प्रमाण वाढू शकते.

आरोग्यविषयक वृत्त