Earthquake | बिकानेरमध्ये 24 तासात दुसर्‍यांदा भुकंपाचे झटके; पाकिस्तान होता केंद्रबिंदू, जीवितहानीचे अद्याप वृत्त नाही

जयपूर : राजस्थानातील (Rajasthan) बिकानेर (Bikaner) परिसरात आज सकाळी ७ वाजून ४२ मिनिटांनी भुकंपाचा (Earthquake) पुन्हा एकदा जोरदार झटका जाणवला. गेल्या २४ तासातील हा दुसर्‍या भुकंपाचा (Earthquake) धक्का असल्याचे नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे.

या भुकंपाची रिश्टर स्केलवर तीव्रता ४.८ इतकी नोंदविली गेली आहे. या भुकंपाचा केंद्रबिंदू कालच्या प्रमाणे आजही पाकिस्तानमध्ये आहे. २९.६५ आणि ६९.५० अक्षांश आणि रेखांक्षावर १५ किमी खोल या भुकंपाचा केंद्रबिंदू असल्याचे राष्ट्रीय विज्ञान केंद्राने (National Center for Seismology) म्हटले आहे. या भुकंपाचा केंद्रबिंदू बिकानेरपासून ४१३ किलोमीटर दूर आहे. जोधपूरपासून ५१३ किमी आणि काबुलपासून ५४६ किमी दूर आहे.

पाकिस्तानातील विविध भागातही या भुकंपाचा झटका जाणवला. या भागात नेहमीच भुकंपाचे धक्के
जाणवत असतात. बुधवारी बिकानेरमध्ये पहाटे ५ वाजून २४ मिनिटांनी ५.३ रेश्टर स्केलचा भुकंपाचा
धक्का जाणवला होता. या भुकंपाच्या केंद्रबिंदूजवळच आजच्या भुकंपाचा केंद्रबिंदू आहे. आजची भुकंपाची तीव्रता कालच्या पेक्षा कमी होती.

हे देखील वाचा

Pune Crime | कोंढवा पोलिसांकडून पुणे कॅन्टोमेंट बोर्डाच्या भाजपच्या माजी नगरसेवक विवेक यादवला गुजरात बॉर्डरवरून अटक

Suspension | ‘त्या’ चार वरिष्ठांवर कारवाई झाल्यानंतर ‘उत्पादन शुल्क’च्या 4 बड्या अधिकाऱ्यांचे तडकाफडकी निलंबन; आयुक्त कांतीलाल उमाप यांची कारवाई, जाणून घ्या प्रकरण

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Earthquake | An earthquake of magnitude 4.8 on the Richter scale occurred hit Bikaner, Rajasthan at 7:42 am today: National Center for Seismology

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update