फिजी बेटाला बसला 6.4 रिश्टर स्केल भूकंपाचा झटका

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नुकत्याच भारतीय हवामान विभागाकडून (IMD ) मिळालेल्या माहितीनुसार फिजी बेटाला सुमारे ६.४ रिश्टर स्केल चा भूकंपाचा तीव्र झटका बसला आहे. जवळ – जवळ ३०० बेटांचा समूह असलेल्या हा देश दक्षिण पॅसिफिक महासागरात आहे.

फिजी बेटाला बसलेला हा धक्का अतिशय तीव्र आहे. भूकंपाने लोकांना प्रचंड धक्का बसला आहे. फिजी बेटाला बसलेला भूकंपाचा हा झटका भारतीय प्रमाण वेळेनुसार ९:२४ वाजता बसला आहे. भुकंपाच्या धक्क्यातुन सावरण्यासाठी सर्व यंत्रणा कामाला लागल्या आहेत. फिजीला आतापर्यंत बसलेल्या भूकंपाच्या धक्क्यांपैकी हा एक मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे असे सूत्रांपासून समजले.

आरोग्यविषयक वृत्त –