देशात एकाचवेळी 2 ठिकाणी भुकंपाचे धक्के ! कर्नाटक आणि झारखंडला ‘हादरा’

नवी दिल्ली : देशात एकाचवेळी दोन वेगवेगळ्या ठिकाणी आज सकाळी ६ वाजून ५५ मिनिटांनी भुकंपाचे धक्के जाणवले. देशात एकाच वेळी मात्र, दोन वेगवेगळ्या प्रदेशात भुकंप होण्याची ही पहिलीच घटना असावी. हे दोन्ही भुकंप ४.७ आणि ४ रेक्टर स्केलचे असल्याने अजूनपर्यंत तरी कोणती हानी झाल्याचे वृत्त नाही.

झारखंडमधील जमशेटपूर येथे आज सकाळी ६ वाजून ५५ मिनिटांनी ४.७ रेक्टर स्केलचा भुकंपाचा धक्का जाणवला. त्याच वेळी सकाळी ६ वाजून ५५ मिनिटांनी कर्नाटकातील हंपी येथेही भुकंपाचे धक्के जाणवले. हा हादरा ४ रेक्टर स्केलचा होता. या भुकंपामुळे घराच्या खिडक्या हादरल्या. घाबरुन लोक बाहेर आले. मात्र, या भुकंपामुळे काही नुकसान झाल्याचे अद्याप वृत्त नाही