ओबीसीमध्ये समावेश हाच मराठा आरक्षणासाठी सोपा पर्याय : खेडेकर

लातूर : पोलीसनामा ऑनलाईन

मराठा समाजासाठी स्वतंत्र आरक्षण सहज शक्य नाही. त्याची अंमलबजावणी म्हणजे वेळेचा अपव्यय करण्याचे राज्य सरकारचे धोरण आहे. त्यामुळे कायद्याच्या चौकटीत आणि कायमस्वरुपी टिकण्याच्या दृष्टीने इतर मागासवर्गात (ओबीसी) सहभाग हाच उत्तम पर्याय आहे, असे मत मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष अ‍ॅड. पुरूषोत्तम खेडेकर यांनी व्यक्त केले. राज्यभर संघाचा जनसंवाद दौरा सुरू असून लातूर येथे त्यांनी मराठा समाजातील बांधवांशी संवाद साधला.

[amazon_link asins=’B0756Z43QS,B0756Z53JN’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’a32bad2b-b4bc-11e8-8a9a-7bf4d825d3dc’]

अ‍ॅड. पुरूषोत्तम खेडेकर म्हणाले, आरक्षणाचा साधा आणि सरळ मार्ग असतानाही यामध्ये अडसर निर्माण केला जात आहे. ओबीसीमध्ये मराठा समाजाचा सहभाग नोंदवून आरक्षणाचा लाभ समाजाला घेता येतो. यासंबंधी अनेक वेळा चर्चा निवदेने देण्यात आली आहेत. शिवाय राज्य मंडळ आयोगानेही हे शक्य असल्याचे सांगितले असूनही केवळ राजकीय स्वार्थापोटी यावर निर्णय झालेला नाही.
लोकसंख्येनुसार किंवा आरक्षणाच्या टक्केवारीनुसारही विचार करून कायद्याच्या चौकटीत आरक्षण बांधून घेणे आवश्यक आहे. आरक्षणावरून मध्यंतरी राज्यात अनेक ठिकाणी हिंसक घटना घडल्या आहेत. राज्यात आतापर्यंत ३५ जणांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यामुळे आरक्षणाच्या मागणीचा रेटा कायम ठेवा मात्र, तो कायद्याच्या चौकटीत असावा. तरुणांनी आत्महत्या करू नये असे अवाहन खेडेकर यांनी केले.

राज्यात ५२ टक्क्यापर्यंतच विविध समाजाला आरक्षणाच्या मर्यादा घालून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे मराठा समाजाचा ओबीसी प्रवर्गात समावेश करूनच आरक्षण शक्य आहे. गेल्या अनेक वर्षापासून हीच मागणी राज्य सरकारकडे मराठा सेवा संघाच्या वतीने करण्यात आली आहे. मात्र, याबाबत आतापर्यंतच्या मराठा मुख्यमंत्र्यांनी उदासिनता दर्शवल्यानेच मराठा समाज आरक्षणापासून वंचित राहिला आहे, असा आरोप खेडेकर यांनी केला. यावेळी प्रदेश कार्यध्यक्ष प्रा. अर्जुन तनपूरे, लिंबराज सुर्यवंशी, उद्धवराव कोळपे, वनिता काळे, जिल्हाध्यक्ष वैभव तळेकर उपस्थित होते.

अकोला : सनातन साधकाकडून संभाजी ब्रिगेडच्या विभागीय अध्यक्षांना ठार मारण्याची धमकी

संवाद दरम्यानच्या प्रश्नोत्तरामध्ये उपस्थित समाज बांधवांनी अ‍ॅड. पुरूषोत्तम खेडकर यांनाच मोर्चाचे नेतृत्व करण्याची घळ घातली. सध्या जागोजागच्या संघटनामुळे मोर्चाला नेतृत्व राहिले नाही. त्यामुळे मोर्चामागची तीव्रता कमी होत असून योग्य दिशा देण्यासाठी तुमच्यासारख्या अनुभवी व्यक्तीमत्वाची गरज असल्याचे अभय साळूंखे यांनी सांगितले.

ट्रान्सजेंडर ऐश्वर्या होणार विवाहबद्ध,  ३७७ कलम रद्द झाल्याने निर्णय