काश्मीरमध्ये चकमकीत 3 दहशतवाद्यांना कंठस्रान; एक पोलीस कर्मचारी शहीद

बडगाम : बडगामच्या बेरवाह भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये सुरु असलेल्या चकमकीत ३ दहशतवादी ठार झाले आहेत. काश्मीरमधील शौपियाच्या बडगाम येथील बेरवाहमध्ये दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाल्यानंतर त्यांचा शोध मध्यरात्रीपासून सुरु करण्यात आला. यात दहशतवाद्यांनी सुरक्षा पथकावर गोळीबार करण्यास सुरुवात केली. त्याला सुरक्षा दलाने प्रती उत्तर देण्यास सुरुवात केली.

 

 

 

गेल्या ८ तासापासूनही चकमक सुरु होती. त्यात ३ दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात पोलिसांना यश आले. त्यांच्याकडून काही शस्त्रात्रे हस्तगत करण्यात आली आहेत. आणखी शोध सुरु असल्याचे पोलीस उपमहानिरीक्षक विजय कुमार यांनी सांगितले. दहशतवाद्यांबरोबरच्या चकमकीत एक पोलीस कर्मचारी शहीद झाला असून तर एक कर्मचारी जखमी झाला आहे.