अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करणाऱ्या पुण्यातील इंजिनियरला अटक

अकोला : पोलासनामा ऑनलाइन – पत्नीचा छळ करून तिच्यावर बळजबरीने अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करणाऱ्या पुण्यातील अभियंत्याला डाबकी पोलिसांनी अटक केली. डबकी पोलिसांनी गौरव उदय कुलकर्णी या अभियंत्याला पुण्यातून अटक केली. ही कारवाई गुरुवारी रात्री करण्यात आली आहे.

डाबकी रोड पोलीस ठाण्यात एका विवाहितेने फिर्य़ाद दिली होती. तिच्या तक्रारीनुसार तिचा विवाह गौरव कुलकर्णी बरोबर झाला होता. लग्नानंतर त्याचे दुसऱ्या मुलीसोबत अफेअर असल्याची माहिती तिला समजली होती. तसेच मुल होत नसल्याच्या कारणावरून सासरच्या लोकांनी तिचा शारिरीक छळ केला. तर गौरवने तिच्या मनाविरुद्ध अनैसर्गीक लैंगिक अत्याचार केला. पीडित महिलेची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. त्यामध्ये तिच्यावर आत्याचार झाल्याचे समोर आले.

आरोपी गौरव कुलकर्णी याला अटक करण्यासाठी डाबकी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक डी.सी. खंडेराव यांचे विशेष पथक काल पुण्यात आले होते. त्यांनी रात्री गौरव कुलकर्णी याला राहत्या घरातून अटक केली.

आरोग्य विषयक वृत्त – 

अर्धवट झोपेमुळे होऊ शकतो व्यायामावर परिणाम

झोपेचे शत्रू वेळीच ओळखा, अनेक आजारांपासून रहाल दूर

एक लिंबू ठरते आरोग्यासाठी फायदेशीर

नैसर्गिक पद्धतीने करा हार्मोन्स बॅलन्स

You might also like