शेतकर्‍यांना न्याय देण्यासाठी संचालक मंडळाचा प्रामाणीक प्रयत्न : दशरथ माने

इंदापूर : पोलीसनामा ऑनलाइन (सुधाकर बोराटे) – स्पर्धेच्या युगात शेतकर्‍यांना आर्थिक न्याय देण्यासाठी कारखान्याच्या संचालक मंडळाने कारखान्याच्या पहिल्या हंगामापासून प्रामाणिकपणे प्रयत्न केला आहे. मागील वर्षीच्या दुष्काळी परिस्थितीतही कारखान्याने शेतकऱ्यांचा ऊस वेळेत गाळप करून साखर व गुळाच्या दरामध्ये जास्तीची तफावत असताना देखील बिलाचे पेमेंट केले आहे. त्यामुळे चालु हंगामात जास्तीत जास्त उसाचे गाळप होण्यासाठी सर्व शेतकरी बांधवांनी आपला ऊस सोनाई कृषि प्रक्रिया कारखान्यास देवुन सहकार्य करावे असे मत सोनाई उद्योग समुहाचे अध्यक्ष दशरथदादा माने यांनी माने यांनी वरकुटे बुद्रुक येथिल सोनाई गुळ प्रक्रिया कारखाण्याच्या गळीत हंगाम शुभारंभ प्रसंगी बोलताना व्यक्त केले.

इंदापूर तालुक्यातील पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील वरकुटे बुद्रुक येथील सोनाई कृषी प्रक्रिया कारखान्याचा तेराव्या गळीत हंगामाचा प्रारंभ कारखान्याचे संस्थापक दशरथ माने, कारखान्याचे कार्यकारी संचालक व पुणे जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य सभापती प्रवीण माने व मुख्य शेतकी अधिकारी सतीश चव्हाण यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आला. यावेळी दशरथ माने बोलत होते. इंदापूर तालुक्यात ऊस उत्पादक शेतकऱ्यांनाअनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते मात्र सोनाई कृषी प्रक्रिया कारखान्यामुळे शेतकऱ्यांना न्याय दिला असल्याचे मत माने यांनी व्यक्त केले.

कारखान्याचे कार्यकारी संचालक व पुणे जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य सभापती प्रवीण माने म्हणाले की, चालू वर्षी गाळप हंगामाचे नियोजन पूर्ण झाले असून कारखान्याचा हंगाम विना अडथळा पार पडेल. चालू वर्षीच्या हंगामासाठी ४ हजार एकरांची नोंद झाले असून दीड लाख मेट्रिक टन गाळपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.तर हंगामासाठी ऊस तोडणी वाहतूक यंत्रणा संपूर्ण तयारीनिशी दाखल झाली आहे.चालु वर्षी गळीत हंगामाचा प्रारंभ करण्यात आला असल्याचे माने यांनी सांगीतले.

सोनई परिवाराची स्थापना मुळातच तालुक्यातील सर्वसामान्य शेतकरी कसा सुखी होईल हे उद्दिष्ट ठेवून संस्थापक अध्यक्ष दशरथ माने यांनी केले आहे. दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांचे पशुधन वाचविण्यासाठी कारखान्याचा मार्फत तालुक्यात चारा छावणी चालू करून कारखान्याने शेतकऱ्यांना दिलासा दिला. यावेळी कारखान्याचे संचालक भारत बोंगाणे, वसंत करे, मनोहर ढुके , वामन वीर ,हमा पाटील, माणिक करे ,आप्पा करे, नाथा व्यवहारे , नाना इजगुडे , कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी बुंजकर, चीफ इंजिनियर सुभाष काळे व कामगार वर्ग वाहतूकदार उपस्थित होते.

Visit : Policenama.com 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like