भद्रावती तालुका राष्ट्रवादी काँग्रेसची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न

भद्रावती : पोलीसनामा ऑनलाइन –   भद्रावती तालुका राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीची अति महत्वाची बैठक येथील राजमनी गार्डन येथे उत्साहात नुकतीच पार पडली.

या बैठकीत जिल्हा परिषद सर्कल, पंचायत समिती सर्कल निहाय पक्षबांधणी च्या नियोजनावर चर्चा झाली. गाव तेथे राष्ट्रवादी हा संकल्प घेवुन सर्व कार्यकर्त्यांनी काम करावे अशी सुचना जिल्हाध्यक्षांनी दिली .

बैठकीला जिल्हाध्यक्ष राजेन्द्र वैद्य ,भद्रावती तालुका निरिक्षक दिपक जैयस्वाल, प्रदेश प्रतिनिधी मुनाज शेख, महिला जिल्हाध्यक्षा बेबीताई उईके, तालुका अध्यक्ष सुधाकर रोहनकर, जिल्हा उपाध्यक्ष अॅड.युवराज धानोरकर, शहर अध्यक्ष सुनील महाले ,साबिया देवगडे,दुर्ग विश्वास उपस्थित होते. या वेळी ग्रामिण भागातुन आलेले कार्यकार्ते यांनी आप आपल्या भागातील समस्या मांडल्या. निरिक्षक दिपक जैस्वाल यांनी नोंद घेवुन संपर्क मंत्री यांच्या कडे पाठपुरावा करून समस्या मार्गी लावु असे आश्वासन दिपक जैस्वाल यांनी दिले.

यावेळी फयाज शेख, स्वप्निल लांबट, अँड कुणाल पथाडे, प्रफुल थेरे, संजय सुरपाम,लभाने, संजय आस्वले, पणवेल शेंडे,रवि नागपुरे,अतुल नारायणे,सुशांत लांडगे,आकाश यांनी सहकार्य केले. तालुका अध्यक्ष सुधाकर रोहनकर यांनी सर्वांचे आभार मानले.

You might also like