मॉडेलचे कपडे पाहून केबिन क्रू मेंबरने दिले जॅकेट, एअरलाइन्सने मागितली माफी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – इंस्टाग्राम आणि ओन्ली फॅन्स मॉडेल इझाबेल सोबत जेटस्टारच्या विमानात एक धक्कादायक घटना घडली आहे. या फ्लाइटमध्ये इझाबेलने ब्लॅक कलरचा क्रॉप टॉप आणि ब्लु जीन्स घातली होती. या दरम्यान विमानातील एका क्रू सदस्याने सांगितले की, तिचा हा आऊटफिट विमानात बसण्यास योग्य नाही. यानंतर जेव्हा इजबेलकडे जॅकेट नव्हते तेव्हा क्रूच्या सदस्यांनी जॅकेटची व्यवस्था केली. या घटनेनंतर मॉडेल शॉकमध्ये आहेत.

इझाबेल म्हणाली की, जेव्हा ती गोल्ड कोस्टहुन मेलबर्नला जाण्यासाठी फ्लाईट घेत होती, तेव्हा तिच्यासोबत ही घटना घडली. प्लेनमधील एका फ्लाइट अटेंडंटने माझे तिकीट पाहिले आणि नंतर मला विचारले की माझ्याकडे काही जम्पर किंवा जॅकेट आहे का जे मी घालू शकेल? मला वाटले आहे की, ते मला यासाठी विचारत आहे , जेणेकरून मला सर्दी होऊ नये. कारण सध्या मेलबर्नमध्ये थंडी असू शकते. इझाबेल पुढे म्हणाली की, त्यानंतर त्या बाईंनी मला सांगितले की, आपण जे आऊटफिट घातले आहे, त्यासोबत आपण प्रवास करू शकत नाही. आपण बिकिनी घालून प्रवास करू शकत नाही आणि मी तिला असेही सांगितले की ती बिकिनी नसून टॉप आहे. यानंतर फ्लाइट अटेंडंटने तिच्या क्रूला बोलावून जॅकेटबद्दल विचारण्यास सुरुवात केली.

या फ्लाइटमध्ये इझाबेल पतीसह प्रवास करीत होती. तिने पुढे म्हंटले की, यानंतर फ्लाइट अटेंडंट आली आणि तिला घालण्यासाठी जॅकेट दिले. इझाबेल म्हणाली की, यावेळी मला खूप लाज वाटली, कारण प्रत्येकजण माझ्याकडे पहात होता. दरम्यान, मी हे जॅकेट घालण्याचा निर्णय घेतला, कारण मला भीती होती की, क्रू मला विमानातून बाहेर काढेल.

इझाबेलने सांगितले कि, फ्लाइट पकडण्यापूर्वी तिने जेटस्टारच्या 8 कर्मचार्‍यांशी चर्चा केली असून त्यापैकी कोणीही तिच्या कपड्यांविषयी काहीही बोलले नाही. ती म्हणाली की, ‘माझ्या या अनुभवामुळे मला धक्का बसला आहे. मी काय घालावे यासाठी मी इतरांच्या मतावर अवलंबून राहू नये. हे 1921 नाही तर 2021 आहे. दरम्यान, घटनेनंतर जेटस्टारने या मॉडेलची माफी मागितली आणि या प्रकरणात सांगितले की, फ्लाईट अटेंडेडला एअरलाइन्सच्या पॉलिसीबद्दल काही गैरसमज होते.