सार्वजनिक शौचालयात साकारली आर्ट गॅलरी

बंगळुरू: वृत्तसंस्था – सामान्यपणे एखाद्या जुन्या आणि वापरता नसणाऱ्या गोष्टींकडे दूर्लक्ष केलं जातं. मात्र काही जण याचा योग्य तो वापर करतात. या टाकाऊ वस्तूपासून टिकावू वस्तू तयार केल्याचे माहित आहे पण वापराविना पडून असलेल्या सार्वजनिक शौचालयात आर्ट गॅलरी उभारल्याचे कधीच पाहिले नसेल. पण हे खार आहे. या वेगळ्या रुपात समोर आलेल्या सार्वजनिक शौचालयाची आर्ट गॅलरी कशी झाली यासंदर्भातील व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत.पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र असणाऱ्या तामिळनाडूमधील उटीमध्ये काही कालाकारांनी हा चमत्कार करुन दाखवला आहे.

आयएएस अधिकारी असणाऱ्या सुप्रिया साहू यांनी ट्विटवरुन यासंदर्भातील एक व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओला दिलेल्या कॅप्शनमध्ये एक वापरात नसणाऱ्या शौचालयाच्या इमारतीलाच आर्ट एक्झिबिशन सेंटर म्हणून वापरण्यासाठी परवानगी देण्यात आली. या आर्ट गॅलरीचे नाव द गॅलरी वन टू असं ठेवण्यात आलं आहे. नगरपालिकेने येथून जवळच नवीन सार्वजनिक शौचाल उभारलं असल्याने या इमारतीमध्ये आर्ट गॅलरी सुरु करण्यासाठी परवानगी देण्यात आली, असं साहू यांनी म्हटलं आहे.

या आर्ट गॅलरीमध्ये एक छोटं ग्रंथालयही सुरु करण्यात आलं असून ते स्थानिकांसाठी मोफत सेवा देणार आहे. येथे बसून स्थानिकांना निवांतपणे पुस्तके वाचता येणार आहेत. ही संकल्पना प्रत्यक्षात आणणारे आर. मणिवन्नम यांचे या आर्ट गॅलरीत काही चित्र लावण्यात आली आहेत. लोक सध्या या आर्ट गॅलरीला चांगला प्रतिसाद देताना दिसत आहे. मात्र एका शौचालयाच्या इमारतीपासून थेट आर्ट गॅलरीपर्यंतचा या इमारतीचा प्रवास सोशल नेटवर्कींगवर चर्चेचा विषय ठरतोय.