सानिया मिर्झाची बहिण घेणार घटस्फोट

हैदराबाद : वृत्तसंस्था

भारताची टेनिसपटू सानिया मिर्झा हिची धाकटी बहिण अनम मिर्झा हिचा हिने आता पतीपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे.

हैदराबाद : टेनिसपटू सानिया मिर्झा हिची धाकटी बहिण अनम मिर्झा हिचा संसार केवळ दोन वर्षातच मोडला आहे़ तिने पती अकबर रशीद याच्यापासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. अनम ही सानियाची स्टायलिस्ट असून तिचे स्वत:चे फॅशन आऊटलेट आहे.

अकबर रशीदचा हैदराबादमध्ये व्यवसाय आहे़ लग्नाआधी अकबर आणि अनम रिलेशनशिपमध्ये होते़ त्यांचा साखरपुडा २०१५ मध्ये झाला होता. या दोघांचा निकाह नोव्हेंबर २००६ मध्ये झाला होता.

अनमचा निकाह धुमधडाक्यात झाला होता. सलमान खान, परिणीती चोप्रा, अर्जुन कपूर, हुमा कुरेशी, लारा दत्त यांनी तिच्या लग्नात उपस्थित राहिले होते़ सलमान आणि परिणिती चोप्रा यांनी या लग्नात केलेला डान्सही गाजला होता.