सोनम कपूर आणि आनंद आहुजा यांचा ‘हा’ फोटो होतोय प्रचंड व्हायरल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अनिल कपूर यांची मुलगी आणि अभिनेत्री सोनम कपूर सध्या सोशलवर चांगलेच चर्चेत असल्याचं दिसत आहे. याला कारणही तसेच आहे. सोनम कपूर आणि आनंद आहुजा यांचे काही फोटो सध्या सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे. या फोटोंमध्ये त्या दोघांचे एकमेकांविषयीचे प्रेम दिसत आहे. त्याचं असिमीत प्रेम वारंवार पाहायला मिळत आहे.

सध्या सोनम आणि आनंद यांच्या व्हायरल होणाऱ्या फोटोंमध्ये पाहायला मिळत आहे की, आनंद आहुजा सोनम कपूरच्या बूटांची लेस बांधत आहे. दोघांच्या चेहऱ्यावर प्रेमपूर्ण स्मित पाहायला मिळत आहे. दोघांनीही एकसारखेच बूट घातल्याचेही फोटोंमध्ये पाहायला मिळत आहे. आनंदच्या या वर्तनावरून त्याच्या सोनमवरील प्रेमाचं दर्शन घडताना दिसत आहे. सध्या आनंद आणि सोनम यांचे हे फोटो सोशलवर चागंलेच व्हायरल होत आहेत.

समोर आलेल्या वृत्तांनुसार, आनंद आणि सोनम हे दोघेही नुकतेच दिल्लीतील एका शु स्टोअरच्या उद्घाटनाला गेले होते. तिथे सोनमने बूटाचा एक जोड घालून ट्राय केला. सोनम बूट घालताना आनंद अचानक गुघड्यावर बसला आणि सोनमच्या बूटाची लेस बांधू लागला. त्यानंतर उपस्थित लोक त्या दोघांना पहातच राहिले. या फोटोत सोनम पिवळ्या आणि आनंद ब्लॅक कलरच्या ड्रेसमध्ये दिसत आहे.

You might also like