आनंद अहुजा शिफ्ट होणार सोनम कपूरच्या घरी

मुंबई : पोलीसनामा  ऑनलाईन

बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूरआणि आनंद अहुजा  याच वर्षी लग्न बंधनात अडकले आहेत. सध्या सोनम आपल्या पतीसह लंडनमध्ये आहे. पण जेव्हा ती भारतात येणार आहे तेव्हा ते दोघे मुंबई मधील वांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये  शिफ्ट होणार आहेत. सोनमने २०१५ साली ३५ कोटी रुपयांना हे घर खेरेदी केलं होतं. याच घरात सोनमचा मेहंदी चा कार्यक्रम  झाली होता.
[amazon_link asins=’B0785JJF7L’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’7e9e1827-8110-11e8-93f9-5f745a0748f2′]

सोनमने या प्रॉपर्टीमध्ये खूप आधीच पैसे गुंतवले होते. त्यांनी प्लॉन केला होता ज्यावेळी दोघे मुंबईत असतील तेव्हा या ठिकाणी रहातील.  सोनमची इच्छा होती वांद्रात तिचा मॅरिटल होम असावा. तिने घराला सजवणे सुद्धा सुरु केले आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या तिच्या लंडन ट्रीप दरम्यान तिने घरातल्या डेकॉरेशनचे काही सामान सुद्धा खरेदी केले आहे.

ते दोघे  मुंबई, दिल्ली आणि लंडनमध्ये या तिनही ठिकाणी राहणार आहे. दिल्ली आणि मुंबईत त्यांचे कुटुंबीय राहतात तर लंडनमध्ये आनंदच्या बिझनेसनिमित्त ते राहातील. वोग मॅगझीनला दिलेल्या मुलाखती दरम्यान सोनमने  त्या दोघांच्या नात्याबद्दल सांगितले होते. तिची आणि आनंदची  पहिली ओळख आणि मग दोघांमधला संवाद कसा वाढला. या साऱ्या  आठवणी तिने शेअर केल्या होत्या.

सोनम लवकरच वडिल अनिल कपूर सोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. ‘एक लडकी को देखा तो ऐसा लगा’ या सिनेमाच्या रिमेकमध्ये ती दिसणार आहे.  या सिनेमाच्या निमित्ताने पहिल्यांदाच सोनम आपल्या वडिलांसोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे.