“तुंबाड”च्या फर्स्ट लूकला रसिकांचा भरभरून प्रतिसाद 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

 ‘तुंबाड’ या एकाच वेळेस मराठीसह हिंदी, तमिळ व मल्याळम भाषेत प्रदर्शित होत असलेल्या चित्रपटाचा हिंदीतील फर्स्ट लूक सोशल मिडियात पोस्ट होताच त्याला रसिकांचा विलक्षण भरभरून प्रतिसाद मिळतोय. अवघ्या चोवीस तासात त्याला ३•५ मिलियन इतके व्हुअर लाभल्याने दिग्दर्शक राही अनिल बर्वे विलक्षण आनंदित  असून तसे त्याने ट्वीटही केले आहे.

‘तुंबाड’ची कथा ही १९२०च्या काळाताली आहे. पुण्यातील एका प्रतिष्ठित बाह्मण कुटुंबाच्या तीन पिढ्यांच्या अवती- भवती फिरणारी ही कथा आहे. त्यामुळे एकंदरीत या थरारपटाच्या टीझरने प्रेक्षकांची उत्सुकता नक्कीच वाढवली आहे.
या चित्रपटाचं दिग्दर्शन राही अनिल बर्वेनं केलं आहे. यात सोहम शाहसोबत ज्योती माळ, अनिता दाते, दीपक दामले आणि रंजिनी चक्रवर्ती यांच्या भूमिका आहेत. महाराष्ट्राशी चित्रपटाच्या कथेचा संबंध असल्याने या चित्रपटाची बहुतांश शूटिंग ही महाराष्ट्रातच झाली आहे. १२ ऑक्टोबर रोजी हा चित्रपट हिंदी आणि मराठीत प्रदर्शित होणार आहे.