हत्तीसमोर नाचत होती मुलगी, हत्तीने सुद्धा दिला रिस्पॉन्स, Anand Mahindra म्हणाले Amazing!!

नवी दिल्ली : प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा (Anand Mahindra) सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात आणि ट्विटद्वारे लोकांना प्रेरित करतात आणि देशातील कुशल प्रतिभावंतांचे कौतुक करतात. ते सहसा आगळे-वेगळे फोटो आणि व्हिडिओ शेअर करतात, जे यूजर्सना खूप आवडतात. अशीच एक व्हिडिओ क्लिप आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केली आहे, जी मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

या व्हिडिओमध्ये एक मुलगी हत्तीसमोर नाचत आहे आणि मग अचानक काहीतरी घडते की आनंद महिंद्रा म्हणतात…Amazing. हा व्हिडिओ कर्नाटकातील कटील येथील श्री दुर्गापरमेश्वरी मंदिराचा आहे, येथे एक नृत्यांगना नाचत आहे आणि तिच्या मागे एक हत्ती उभा आहे.

गजराजने दिला मुलीला आशीर्वाद
या व्हिडीओमध्ये पारंपारिक नृत्य करताना ही मुलगी हत्तीसमोर हात जोडून डोके झुकवते, ती असे करताच गजराज तिच्या डोक्यावर सोंड ठेवून आशीर्वाद देतात. हे पाहून आनंद महिंद्रा आश्चर्यचकित झाले आणि त्यांनी हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला.

आनंद महिंद्रा यांच्या ट्विटनंतर व्हिडिओ व्हायरल
महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनी हा व्हिडिओ शेअर केला आणि कॅप्शन लिहिले की,
Amazing! मला वाटतं मंदिराचा गजराज आपल्या सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत आहे.
त्यांचा हा व्हिडीओ ट्विटर युजर्सना खूप आवडला असून कमेंट करून ते आपल्या भावना व्यक्त करत आहेत.

Web Title :- Anand Mahindra | anand mahindra tweet viral video girl dance in a temple