उद्योगपती आनंद महिंद्रांनी CM ठाकरेंच्या वाढीव Lockdown च्या निर्णयाचं टाळ्या वाजवून केलं ‘कौतुक’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेवर नियंत्रण आणण्यात यश मिळत आहे. मात्र राज्यात आणखी 15 दिवस निर्बंध कायम राहणार आहेत. 15 जूनपर्यंत राज्यातील लॉकडाऊन Lockdown वाढवण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती, तेथील वैद्यकीय यंत्रणांची उपलब्धता पाहून त्या जिल्ह्यातील लॉकडाऊन Lockdown शिथील करण्याबाबत किंवा वाढविण्यासंदर्भात निर्णय घेतला जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या अधिकृत अकाऊंटवरुन ट्विटही केले आहे. मुख्यमंत्र्यांच्या ट्विटला रिट्विट करत, उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी मुख्यमंत्र्यांचे कौतुक केले आहे. पारदर्शी, सक्रीय आणि दिलासा देणारे विधान मुख्यमंत्र्यांनी केले आहे. त्यांचे हेच दिलासादायक आणि व्यवहार्यपूर्ण विधान ऑक्सिजनची पूर्तता आणि टीपी रेटला धरुन असल्याचे महिंद्रा यांनी म्हटले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील उद्योगपतींसोबत काही दिवसांपूर्वी कोरोनासंदर्भात व्हर्च्युअल बैठक घेतली होती. या बैठकीत ठाकरे यांनी राज्यातील कोरोनाची परिस्थिती, उपाययोजना, तसेच लसीकरणाबाबत उद्योगपतींशी चर्चा केली होती. या बैठकीतील अनुभव सांगतानाही महिंद्रा यांनी मुख्यमंत्र्यांच्या कामाचे कौतुक केले होते. सीएमओने केलेल्या ट्विटला महिंद्रा यांनी रिट्विट करत उत्तर दिलं होत, आज पुन्हा तसेच ट्विट महिंद्रा यांनी केले आहे. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही दिवसापूर्वी राज्यातील जनतेला संबोधित करताना लॉकडाऊनबाबत वक्तव्य करणा-या उद्योगपती महिंद्रा यांचे नाव न घेता टीका केली होती. महिंद्रा याने लॉकडाऊन करण्याऐवजी आरोग्य सुविधा वाढवण्यावर लक्ष केंद्रीत करा असा सल्ला दिला होता. आरोग्य सुविधा वाढवल्याच आहेत आणि त्या वाढवणे सुरुच आहे. पण केवळ आरोग्य सुविधा वाढवून चालणार नाही. तर त्यासाठी आरोग्य कर्मचारी, डॉक्टरांची गरज आहे. आरोग्य सुविधा हाताळण्यासाठी तज्ज्ञांची गरज भासत असते. त्यांचा पुरवठा हे उद्योगपती करणार का? असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला होता.

Also Read This : 

दिलासादायक बातमी ! कोरोनाच्या केस होताहेत कमी, 12 आठवड्यानंतर मृत्यूंचे आकडेसुद्धा घसरले

‘या’ वयात सर्वात जास्त मिळतो शरीरसुखाचा आनंद, जाणून घ्या कालावधी

‘प्रेमा’ला विरोध झाल्याने चुलत बहिण-भावाने केली ‘आत्महत्या’

Pune : भरधाव दुचाकीनं रस्ता क्रॉस करणार्‍या 7 वर्षाच्या सियाला उडवलं; चिमुरडी गंभीर जखमी

रोहित पवारांचा चंद्रकांत पाटलांवर निशाणा, म्हणाले – ‘राज्याला केंद्राप्रमाणे कंपन्या विकून पैसे मिळत नाहीत’