आनंद महिंद्रांनी शेअर केला ‘फोटो’, सर्वात चांगले ‘कॅप्शन’ देणाऱ्याला देणार अलिशान ‘कार’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आनंद महिंद्रा कायमच त्यांच्या ट्विटमुळे चर्चेत असतात. नुकतेच त्यांनी ट्विटरवर एक कॅप्शन देऊन फोटो शेअर केला आहे. महिंद्रा यांनी जो फोटो शेअर केला आहे. त्यात त्या बसच्या वरच्या टपावर आणखी एक हेडलाइट आहे आणि वरती देखील चाकं असल्याचे दिसत आहे. त्यामुळे असे वाटते की बसवर दुसरी एक बस आहे. बसचा फोटो शेअर करत त्यांनी कॅप्शन दिले की, अनेक दिवसांपासून मी कॅप्शन कॉम्पिटीशन घेतली नाही. कॅप्शनसाठी हा फोटो योग्य आहे. कॅप्शन हिंदी, इंग्रजी किंवा हिंग्शिल कशातही देऊ शकतात.

फोटो पोस्ट केल्यानंतर काही तासात यावर हजारो कमेंट्स आणि लाइक आले. अनेकांनी यावर अनेक मजेशीर कमेंट आल्या. या कमेेंट देणाऱ्यात काँग्रेस नेते अखिलेश सिंह यांच्या देखील समावेश आहे.

तुम्ही देखील यावर सकाळी 10 वाजेपर्यंत कमेंट करु शकतात. यात विजयी होणाऱ्याला महिंद्राची एक अलिशान कार मिळणार आहे. आनंद महिंद्रा अनेक मजेशीर, विचार करायला लावणारे आणि कॉम्पिटीशन असलेले व्हिडिओ फोटो शेअर करत असतात. गणेश चुतर्थीला त्यांनी एक अमेरिकन ट्रम वाजवत असलेला व्हिडिओ पोस्ट केला होता.

You might also like