Anand Nagar SRA Scheme | विकसकाच्या फायद्यासाठी आनंदनगर झोपडपट्टीवासियांचे बेकायदा पुनर्वसनाचा वाद चिघळत चालला; आनंदनगर झोपडपट्टीची एस.आर.ए. योजना रद्द केल्याने नागरिक संतप्त

विकसक आणि एस.आर.ए.च्या अधिकार्‍यांवर कारवाईची मागणी


पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –
Anand Nagar SRA Scheme | बिबवेवाडी येथील गंगाधाम चौकानजीक (Gangadham Chowk, Bibvewadi) असलेल्या आनंदनगर झोपडपट्टीतील (Anand Nagar, Pune) नागरिकांच्या संशयास्पद पुनर्वसनाचा वाद सुरू असतानाच आणखी एक प्रकरण समोर आले आहे. येथील नागरिकांचे त्याच जागेवर एस.आर.ए. अंतर्गत पुनर्वसन करण्याची प्रक्रिया १४ वर्षांपुर्वी सुरू करण्यात आली होती. मात्र, या जागेवरील आरक्षणच उठविल्याचा आरोप करत आनंदनगर मधील नागरिकांनी आज मार्केटयार्ड पोलिस ठाण्यात विकसक (Builders In Pune) आणि एस.आर.ए.च्या अधिकार्‍यांवर (SRA Officers) फसवणुकीचा (Cheating Case) गुन्हा नोंदवावा अशी मागणी केली आहे. (Anand Nagar SRA Scheme)

 

बिबवेवाडी येथील गंगाधाम चौकानजीक ३५ ते ४० वर्षे जुनी आनंदनगर झोपडपट्टी आहे. या झोपडपट्टीच्या मागे ‘सॉलिटेअर’ कंपनीचे निवासी संकुलाचे काम सुरू आहे. यामुळे अगदी दर्शनी भागात असलेली झोपडपट्टी हटविण्यात येणार आहे. भाजपच्या स्थानीक लोकप्रतिनिधींनी नुकतेच येथील काही कुटुंबियांचे बिबवेवाडी येथील हिलटॉप हिलस्लोप येथे अनधिकृत बांधलेल्या इमारतींमध्ये पुनर्वसन केले आहे. या इमारती बेकायदा असल्याने काही मंडळींनी तिथे जायला विरोध केल्याने मागील आठवड्यात चांगलाच वाद रंगला. भाजपचे आमदार आणि स्थानीक लोकप्रतिनिधींनी शिवीगाळ आणि मारहाणही केल्याचा आरोप करत नागरिकांनी पोलिस आयुक्तांकडे ऑनलाईन तक्रार अर्ज केला आहे. (Anand Nagar SRA Scheme)

 

दरम्यान, आज आनंदनगर येथील नागरिकांनी सकाळी वसाहतीतील सर्व नागरिकांनी एकत्र येत मार्केटयार्ड पोलिस ठाण्यात अर्ज केला आहे. त्यामध्ये आनंदनगर येथे एस.आर.ए. योजनेअंतर्गत इमारत बांधून नागरिकांचे पुनर्वसन करण्यात येणार होते. हे काम स्टार कन्स्ट्रक्शनचे विकसक राकेश शर्मा हे करणार होते. परंतू यासंदर्भातील प्रक्रिया सुरू झाल्यानंतर मागील १४ वर्षांमध्ये प्रत्यक्ष फारशा हालचाली झाल्याच नाहीत. दरम्यानच्या काळामध्ये आनंदनगर मधील ज्या जागेवर एस.आर.ए.ची स्किम होणार होती त्या स.नं. ५८०/१/१/१ या जागेवरील एस.आर.ए.चे आरक्षणच वगळण्यात आले आहे. याची कुठलिही कल्पना आनंदनगर मधील नागरिकांना देण्यात आलेली नाही. विकसक राकेश शर्मा आणि एस.आर.ए.च्या अधिकार्‍यांनी नागरिकांची फसवणूक केली आहे, असा आरोप करत नागरिकांनी २००२ पासून आजतागायत झालेल्या पत्रव्यवहाराचे पुरावे देखिल यासोबतच जोडले आहेत.

विशेष असे की, ९ डिसेंबर २०२१ मध्ये शहर सुधारणा आणि सर्वसाधारण सभेमध्ये येथील लगतच्याच
स. नं.५७७,५७८ आणि ५७९ मध्ये कलम २०५ अन्वये २४ मी. रस्ता आखण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
याच जागेवरील ३० मी. रस्ता रुंदी ऑक्टोबर २०१९ मध्ये वगळण्यात आली होती.
वस्तीतून जाण्यासाठी आखण्यात आलेला २४ मी. रुंद रस्ता रद्द करावा,
असे पत्रही यावर्षी एप्रिलमध्ये महापालिका आयुक्तांना दिले होते, असे आंदोलकांनी पोलिसांकडे दिलेल्या पुराव्यांवरून समोर येत आहे.

 

Web Title :- Anand Nagar SRA Scheme | Controversy raged over the illegal resettlement of Anandnagar slum dwellers for the developer’s benefit; SRA of Anandnagar Slum Citizens angry over cancellation of scheme

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Krushi Utpanna Bazar Samiti Maharashtra Elections | राज्यातील २८१ कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर

 

Pune Crime | नगरसेवकाकडे 25 लाख रुपये खंडणी मागणारा RTI कार्यकर्ता जितेंद्र भोसलेवर गुन्हे शाखेकडून FIR

 

BJP MLA Gopichand Padalkar | श्रीलंकेतील नेते पळून गेले तसे पवारांना आता पळून जावं लागणार, गोपीचंद पडळकर यांचा हल्लाबोल