आनंद रिठे यांची शहर सुधारणा समिती सदस्यपदी निवड

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पुणे महापालिकेतील विवध विषय समितीच्या सदस्यांची आज (शुक्रवार) निवड करण्यात आली. शहर सुधारणा, महिला व बाल कल्याण, क्रीडा, विधी समितीच्या सदस्यांची आज निवड करण्यात आली. नगरसेवक आनंद रिठे यांची शहर सुधारणा समितीच्या सदस्यपदी निवड करण्यात आली. आनंद रिठे यापूर्वी पुणे महानगर पालिकेच्या क्रीडा समितीवर सदस्य होते.

पुणे महापालिकेत झालेल्या मुख्य सभेत ही नियुक्ती करण्यात आली. आज निवड करण्यात आलेल्या प्रत्येक समितीच्या सदस्यांची संख्या १३ आहे. पक्षीय बलाबलानुसार भाजपचे ८, राष्ट्रवादी ३, काँग्रेस आणि शिवसेनेचा प्रत्येकी १ सदस्याची निवड करण्यात आली.