राहुल गांधींना समजले नाहीत राष्ट्रपती कोविंद यांचे ‘हिंदी’ शब्द, म्हणून ते…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी गुरुवारी संसदेत संयुक्त सत्रात संसदेला संबोधित केले. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देशाला जोडणाऱ्या मुद्यांवर भाष्य केले. परंतू राष्ट्रपतींचे भाषण प्रेरणा देणारे नसल्याचे काँग्रेसने म्हणले आहे. तर रामनाथ कोविंद अभिभाषण देत असताना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी मोबाईल फोन वापरत असल्याचे आणि सतत बोलत असल्याचे समोर आल्यानंतर सोशल मिडियावर बरीच चर्चा रंगली. टीका झाली, त्यानंतर आनंद शर्मा यांनी यावर स्पष्टीकरण दिले आहे.

राहुल गांधी मोबाईल फोन वापरत असल्याचे आणि सतत बोलत असल्याचे समोर आल्यानंतर आनंद शर्मा यांनी स्पष्टीकरण देताना सांगितले की, हे सर्व आरोप चूकीचे आहेत. राहुल गांधी यांनी संपुर्ण भाषण लक्ष देऊन ऐकले आहे.

म्हणून राहुल गांधी बोलत होते –

आनंद शर्मा यांनी सांगितले की, अभिभाषणात काही हिंदी शब्द असे होते, जे राहुल गांधींना समजले नाहीत, त्यामुळे ते त्या शब्दांबाबत विचारात होते. अभिभाषणावेळी मीच त्यांच्या सोबत होतो. राहुल गांधी राष्ट्रपतींच्या अभिभाषणा वेळी सतत बोलत असल्याचे आणि फोनचा वापर करत असल्याचे समोर आले होते, त्यामुळे ते ट्रोल देखील झाले, त्यानंतर यावर पक्षाकडून स्पष्टीकरण देण्यात आले.

पत्रकारांशी बोलताना आनंद शर्मा यांनी हे स्पष्टीकरण दिले, ते यावेळी म्हणाले की, राष्ट्रपतींच्या अभिभाषणात बेरोजगारीच्या मुद्यावर कोणतेही भाष्य करण्यात आले नाही. ते म्हणाले की देशात बेरोजगारीचा आकडा वाढत आहे. मोदी सरकारने मागील कार्यकाळात जी आश्वासने दिली होती ती त्यांनी पुर्ण केली नाही. ज्याबद्दल राष्ट्रपती आपल्या अभिभाषणात काहीही बोलले नाहीत.

आरोग्यविषयक वृत्त –

योग्य पद्धतीने बटाटा खा आणि वजन नियंत्रणात ठेवा

नैसर्गिक पद्धतीने करा हार्मोन्स बॅलन्स

अचानक येणारा हृदयविकाराचा झटका रोखता येऊ शकतो

कोणत्याही गोष्टीच टेंन्शन घेण्याअगोदर स्वतःचा विचार करा