ग्रामपंचायत निवडणुकांच्या निकालानंतर आनंद शिंदेचं एकदम ‘पॉवरफुल’, ‘घासून नाही रे ठासून आला…’

पोलिसनामा ऑनलाईन – १५ जानेवारी रोजी राज्यातील १५,२४२ ग्रामपंचायत निवडणुकांसाठी मतदान घेण्यात आले होते. त्यापैकी अनेक ग्रामपंचायती बिनविरोध निकाली निघाल्या आहेत. तर, उर्वरीत ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल सोमवारी जाहीर करण्यात आला. मोठ्या प्रमाणात गावागावात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. अनेक जिल्ह्यात पोलीस प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाने मिरवणूक, विजयाचे सेलिब्रेशन, रॅली आणि सार्वजनिक संभांना बंदी घातली होती. त्यामुळे विजयाचे सेलिब्रेशन करण्यासाठी उमदेवार आणि गावकऱ्यांवर काही बंधनं होती. तरीही सोशल मीडियाचा आधार घेऊन गावकऱ्यांनी, विजयी उमेदवारांनी आणि पॅनेलप्रमुखांनी जंगी सेलिब्रेशन केलं. त्यामध्ये, प्रसिद्ध गायक आनंद शिंदे (anand shinde ) यांच्या गाण्याची चर्चा सर्वत्र दिसून आली..

राजकीय पक्षांच्या पुरस्कृत आघाड्यांद्वारे गावातील गटा-तटांची ही निवडणूक असते. त्यामुळे, कोणता गट कोणत्या पक्षाचा हे ठामपणे सांगातही येत नाही. तरीही, राजकीय नेते ग्रामपंचायतींवर आपल्या पक्षाचे वर्चस्व असल्याचे सांगतात. मात्र, निवडणूक निकालानंतर गुलालाची उधळण, गळ्यात फुल-हारांची माळ अन् हलगीचा नाद पाहायला मिळाला. गावागावात गुलाल आमचाच.. अशी घोषणाबाजीही झाली. तर, सोशल मीडियावर विजयी उमेदवाराचे फोटो शेअर करत, आमचा नेता लय पॉवरफुल ही टॅगलाईनही दिसून आली. ग्रामपंचायत निवडणुकांच्या प्रचारातही व्हॉट्सअप स्टेटस आणि फेसबुकवर व्हिडिओ बनवून डिजिटल प्रचार पाहायला मिळाला. आपल्या पॅनेलच्या उमेदवारांसाठी विविध गाण्यांसह चित्रफीतही तयार करण्यात आल्या होत्या. त्यातूनच, गावकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न उमेदवारांचा आणि गावच्या नेतेमंडळींचा होता. सोशल मीडियामुळे अगदी दिल्लीत असलेल्या गाववाल्याचा गल्लीतल्या निवडणुकीत सहभाग दिसून आला. गावच्या निवडणूक निकालाकडे सर्वांचेच लक्ष लागले होते.

फेसबुक आणि व्हॉट्सअप स्टेटससाठी लहानसहान व्हिडिओही पाहायला मिळाले. या व्हिडिओत, घासून नाही रे ठासून आला… भल्या भल्यांचा वांदा केला हेच गाणं बॅकग्राऊंडला ऐकायला मिळालं. लोकगीताचे बादशहा आनंद शिंदेंनी गायलेलं हे गीत ग्रामपंचायत निवडणुकांच्या पॅनेलप्रमुखांना आपलं वाटू लागलंय. कारण, शिवसेना, राष्ट्रवादी, मनसे या तिन्ही पक्षांनी आपली गाणी पक्षासाठी, निवडणुकांसाठी लोकप्रिय केली आहेत. मात्र, ग्रामपंचायत निवडणुका ह्या पक्षांऐवजी गटातटात, व्यक्तींच्या बळांवर लढवल्या जातात. त्यामुळे, आमचा नेता लय पॉवरफुल… हेच गाणं ग्रामपंचायत निवडणुकांच्या निकालानंतर आकर्षण ठरलं जुगाड चित्रपटातील गाणं

‘आमचा नेता लय पावरफुल’ या गाण्याचे गीतकार जीवन घोंगडे असून प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांनी हे गाणं गायलंय. तर, शैलेश धारणगावकर यांनी गाण्याला संगीत दिलंय. ‘जुगाड’ या मराठी चित्रपटातील हे पॉप्युलर पॉलिटीकल साँग आहे. गावात स्वत:ची सत्ता टिकविण्यासाठी गावातील दोन पाटील नवीनवीन गोष्टी गावात घेऊन येत असतात आणि दुसर्‍यावर कुरघोडी करून पॉलिटिक्स करीत काय-काय जुगाड करता येतील, यासाठी कसे प्रयत्नशील असतात. खलनायक फेम अभिनेता नागेश भोसलेंसोबत सिद्धेश्‍वर झाडबुके, विजय चव्हाण आदींनी या चित्रपटाक काम केलंय. मयूर वैष्णव यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केल आहे, तर मोहन ठोंबरे चित्रपटाचे निर्माते आहेत. या चित्रपटाला म्हणावा तेवढा प्रतिसाद मिळाला नाही, पण चित्रपटातील एका गाण्याने राजकीय धुरळा उडवला. ते गाणे म्हणजेच… आनंद शिंदेंच्या भारदस्त आवाजातील ‘जो पत्ता करतो गुल, आमचा नेता लय पॉवरफुल’.

आनंद शिंदे हे प्रचंड ताकदीचे गायक असून संगीत क्षेत्रात त्यांचा वेगळाच रुबाब आहे. आपल्या गाण्यांनी ते संगीतप्रेमी आणि चाहत्यांच्या मनात घर करतात, त्यांची भीमगीते लोकप्रिय आहेत. राजकारणावर आधारित आमचा नेता लय पॉवरफुल…. या गाण्याचे सूर, ताल आणि लय सगळच एकमद पॉवरफुल्ल बनलंय. त्यामुळेच, राज्यात ग्रामपंचायतींपासून ते लोकसभेच्या निवडणुकांमध्येही या गाण्याचा बोलबाला दिसून येतो. आनंद शिंदे यांनी गायलेली ‘माझा नवीन पोपट हा’, ‘तू लाख इबादत करले…’, ‘सुन मेरी अमिना दिदी’, ‘तुझा पोरगा डायवर हाय’ ते ‘ तुझी चिमनी उडाली भूर्रर्र’ आदी गीते, लोकगीते आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील गाणी विशेष प्रसिद्ध आहेत. त्यामुळेच, लोकगीतांचा बादशहा म्हणून आनंद शिंदे महाराष्ट्र आणि देशात प्रसिद्ध आहेत. आनंद शिंदेंच्या गाण्यांचा एक वेगळाच चाहता वर्ग असून ग्रामीण भागातील लोकांना ही गाणी आपलीसी वाटतात.

आमचा नेता लय पॉवरफुल… शब्दबद्ध केलेलं गीत

शेहनशा, बादशाह
शेरदिल आमचा नेता
मेहरबान, कदरदान
संगदिल आमचा जेता

तो पत्ता करतो गुल
हो हो
तो पत्ता करतो गुल पावरफुल
पत्ता करतो गुल पावरफुल
हाय आमचा नेता लय पावरफुल

घासून नाही रे ठासून आला
घासून नाही रे ठासून आला
भल्या भल्यांचा वांदा केला
भल्या भल्यांचा वांदा केला
घासून नाही रे ठासून आला
भल्या भल्यांचा वांदा केला
भल्या भल्यांचा वांदा केला
त्याला बगून बत्ती गुल पावरफुल
अरे। बगतोस काय रागान
तुला चितपट केलय वाघान
तो dashing पडतोय भूल पावरफुल
तो पत्ता करतो गुल पावरफुल

अरे बघू नको चल मुजरा कर
बघू नको चल मुजरा कर
हेय आमचा झेंडा हातात धर
आमचा झेंडा हातात धर
अरे बघु नको चल मुजरा कर
आमचा झेंडा हातात धर
आमचा झेंडा हातात धर

केला जुगाड जुगाड जुगाड देऊन हूल
केला जुगाड देऊन हूल पावरफुल
तो पत्ता करतो गुल पावर
जुग जुग जुगाड जुगाड जुगाड
जुग जुग जुगाड जुगाड हो