आनंद तेलतुंबडे यांना अटक होण्याची शक्यता

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – भीमा कोरेगाव हिंसाचार आणि नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरून दाखल गुन्ह्यात पुणे न्यायालयाने प्रा. आनंद तेलतुंबडे यांचा अटकपुर्व जामीन शुक्रवारी फेटाळून लावला. त्यामुळे त्यांना अटक होण्याची शक्यता आहे.

एक जानेवारी २०१८ रोजी पुण्यातील कोरेगाव भीमा परिसरात झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर प्राध्यापक आनंद तेलतुंबडे यांच्याविरोधात पुणे पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा रद्द करण्यासाठी त्यानी सर्वोच्च न्यायालायत धाव घेतली होती. त्यावेळी तेलतुंबडे यांना अटक न करण्याला आणखी चार आठवड्यांची मुदतवाढ देण्यात आली होती. जामिनासाठी अर्ज करता यावा, यासाठी हे संरक्षण देण्यात आले होते. . पोलिस तपासात आणखी माहिती उजेडात येत आहे. या गुन्ह्याची व्याप्तीही मोठी आहे. त्यामुळे आता गुन्हा रद्द करणे योग्य ठरणार नाही, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले होते. त्यानंतर तेलतुंबडे यांनी पुणे न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. त्यावर गुरुवारी पुणे न्यायायलयात सुनावणी घेण्यात आली. यावेळी. भारतीय कम्यूनिस्ट पार्टीने कोरेगाव भीमा दंगलीचा वापर देशात अराजक माजवण्यासाठी करा, असा ठराव केला होता. त्यांनी चळवळीच्या ५० व्या वर्धापन दिनानिमित्त माओवाद्यांना काही सूचना केल्या होत्या सर्व संशयित एकमेकांच्या संपर्कात होते. त्यासोबतच देश विरोधी कारवाईमध्ये ते सहभागी असल्याचे त्यांच्या ई-मेल संभाषणातून समोर आले आहे.

या पत्रातील उल्लेख असलेला मनोज कोण आहे. त्याच्याकडून किती कुरिअर पाठवण्यात आले आहे. त्यांना पैसे कुठून मिळाले. याच्या तपासासाठी आनंद तेलतुंबडे यांच्याकडे चौकशी करायची असल्याने त्यांचा अटकपुर्व जामीन फेटाळण्यात यावा असा युक्तीवाद जिल्हा सरकारी वकील उज्ज्वला पवार यांनी केला. मात्र शोमा सेन यांच्या लॅपटॉपमध्ये जे मेल मिळाले आहेत, त्यामध्ये तेलतुंबडे यांनी पॅरिसला जाऊन कोरेगाव भीमा विषय ज्वलंत ठेवावा असे सूचित करण्यात आले. असा हा मेल बनावट असल्याचा दावा बचाव पक्षाच्या वकिलांनी केला होता. आनंद तेलतुंबडे हे अमेरिकन विद्यापीठाच्या निमंत्रणावरून २०१७ ला पॅरिसला गेले होते. त्याचा खर्च हा त्या विद्यापीठाने केला होता. या दौऱ्याचा माओवाद्यांशी काहीही संबंध नाही, कोणत्याही पत्रामध्ये आनंद तेलतुंबडे यांचा थेट उल्लेख नाही. जर कॉम्रेड प्रकाश असा उल्लेख असेल तर पोलीस उद्या प्रकाश आंबेडकर असा दावा करतील का असा युक्तीवाद दावा बचाव पक्षाच्या वतीने करण्यात आला होता.

दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यावर शुक्रवारी न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्जावर निकाल देत तो फेटाळला.

मध्यमवर्गीयांना दिलासा दिला – योगेश गोगावले
निराशाजनक अर्थसंकल्प – रमेश बागवे