आनंद तेलतुंबडे राज्य सरकारविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – आजच्या निर्णयाने मला आनंद झाला आहे. पण शुक्रवारपासून मला जो अपमान सहन करावा लागला आहे. तो वर्णन करता येण्यासारखा नाही. राज्य सरकारकडे माझ्याविरोधात एकही पुरावा नाही. त्यामुळे मी राज्य सरकारविरोधात सोमवारी सर्वोच्च न्यायायलायत अवमान याचिका दाखल करणार आहे. अशी प्रतिक्रिया आनंदल तेलतुंबडे यांनी दिली.

मुंबई विमानतळावर मला पोलिसांनी ताब्यात घेतलं. काही काळ थांबवून ठेवलं. त्यानंतर या सर्व प्रकाराचा मला फिजीकल त्रास झाला आहे. आज न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे स्वागत करतो. त्याने मला आनंद झाला आहे. मला पॅरिसमध्ये अमेरिकन विद्यापीठाने बोलवले होते. त्या परिषदेचा आणि माओवाद्यांचा राज्य सरकारकडे माझ्या विरोधात एकही पुरावा नाही. त्यामुळे मला लवकरच न्याय मिळेल. तर मिलिंदला मी मागील ३४ वर्षे भेटलो नाही. राज्य सरकारविरोधात सोमवारी न्यायालयाचा अवमान केल्याप्रकऱणी याचिका दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

एल्गार परिषदेप्रकरणी नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या कारणावरून पुणे पोलिसांनी आनंद तेलतुंबडे यांना शनिवारी अटक करण्यात आली. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने त्यांना चार आठवड्यांचे संरक्षण दिले होते. त्याची मुदत संपण्याआधीच पोलिसांनी त्यांना अटक केल्याने ही अटक बेकायदेशीर असल्याचे सांगत त्यांना तातडीने सोडून देण्याचे आदेश न्यायालयाने दिले. त्यानंतर ते बोलत होते. नक्षलवाद्यांसोबत संबंध असल्याच्या कारणावरून अटक कऱण्यात आल्यानंतर आनंद तेलतुंबडे यांची अटक अवैध असून त्याना तातडीने सोडण्याचे आदेश न्यायालयाने दिले.