धनगर समाजाचा निवडणुकीपुरता वापर करणाऱ्यांच्या जाहीरनाम्यात धनगर आरक्षण मुद्दा का नाही : आनंद थोरात

दौंड : पोलीसनामा ऑनलाइ (अब्बास शेख) – दौंड तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. या रणधुमाळीमध्ये विरोधकांनी धनगर आरक्षण मुद्द्यावर राजकारण सुरू केले आहे पण आता विरोधकांचे पितळ उघडे पडू लागले असून त्यांनी आपल्या जाहीरनाम्यात धनगर समाजाला आरक्षण देऊ हा मुद्दा घेतला नाही यावरूनच धनगर समाज यांना फक्त राजकारणापूरताच हवाय अशी आता खात्री पटली आहे अशी टिका धनगर सामाजाचे नेते आनंद थोरात यांनी विरोधकांवर केली आहे.

पुढे बोलताना त्यांनी दौंडचे विद्यमान आमदार राहुल कुल हे केलेली विकासकामे आणि तालुक्यात विकासाच्या दृष्टीने आणण्यात येणारे प्रकल्प यांची माहिती आपल्या भाषणांतून आणि अहवालातून घरोघरी पोहोच करत आहेत. मात्र विरोधकाकांडे कुठलेच व्हिजन नाही, तालुक्याच्या भवितव्याबाबत कोणतीच योजना नाही, तालुक्याच्या दृष्टीने उपयुक्त अशी कोणतीच रचना यांच्या डोक्यात नाही, ना कुठले निर्णय तालुक्याच्या दृष्टीने घेण्याचे यांच्या तोंडून निघततात.

विरोधक फक्त राहुल कुल यांच्यावर टिका आणि टिप्पणी करतात. यांच्याकडे आता कुल यांच्या विरोधात कुठलेच मुद्दे राहिले नाही म्हणून संपविण्याची भाषा करतात हे कशाचे प्रतिक आहे हे जनतेला कळून चुकले आहे त्यामुळे जनता पुन्हा राहुल कुल यांच्याच पाठीशी उभी राहून त्यांना मोठ्या मताधिक्याने निवडून देईल असा विश्वासही त्यांनी बोलून दाखवला.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी