‘लॉकडाऊन’मध्ये अनन्या पांडेच्या फॉलोवर्समध्ये झपाट्यानं ‘वाढ’, 10 मिलियन्सचा टप्पा गाठल्यानं शेअर केली खास ‘पोस्ट’ !

पोलीसनामा ऑनलाईन :बॉलिवूड स्टार अनन्या पांडेचं करिअर सध्या पीकवर आहे. तिला एकापाठोपाठ एक प्रोजेक्ट्स मिळताना दिसत आहेत. एवढंच नाही तर सोशल मीडियावरदेखील तिचे फॉलोवर्स वाढताना दिसत आहेत. इंस्टावर अनन्याच्या फॉवोवर्सची संख्या 1 कोटींहून अधिक झाली आहे. फॉलोवर्सची संख्या वाढल्यानं अनन्यानंही खूप खुश दिसत आहे. इंस्टावरून अनन्यानं आपला आनंद व्यक्त केला आहे.

अनन्यानं एक पोस्ट शेअर करत लिहिलं की, “मित्रांनो सर्वांना माझं खूप सारं प्रेम. नेहमीच माझ्या सोबत राहण्यासाठी आणि एवढं प्रेम माझ्यावर करण्यासाठी धन्यवाद. तुमच्या सर्वांशिवाय मी काहीच नाही. सर्वच प्रेमळ संदेशासाठी खूप खूप धन्यवाद. माझ्या फॅन क्लब आणि अनन्याजलादेखील खूप सारं प्रेम.” असंही तिनं आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

अनन्याच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर अर्जुन रेड्डी फेम विजय देवरकोंडासोबत आपल्या एका सिनेमाला घेऊन सध्या ती चर्चेत आहे. या सिनेमाचं नाव फायटर आहे. दोघंही या सिनेमाबद्दल खूप एक्सायटेड आहेत. याशिवाय अनन्या ईशान खट्टर सोबत खाली पीली या सिनेमात काम करताना दिसणार आहे. मकबूल खान दिग्दर्शित हा सिनेमा 12 जून 2020 रोजी हा सिनेमा रिलीज होणार आहे.

View this post on Instagram

rise & shine 😁 #AnissaMaanGayi ❤️

A post shared by Ananya 💛💫 (@ananyapanday) on

View this post on Instagram

#IshaRah 🖤✨

A post shared by Ananya 💛💫 (@ananyapanday) on

View this post on Instagram

looking for my yellow paint 🎨 #Umang2020 💛

A post shared by Ananya 💛💫 (@ananyapanday) on

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like