पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवावर ‘आनंदी गोपाळ’ची ‘छाप’

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – अठराव्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा समारोप झाला. यावेळी पुरस्कारांचे वितरण देखील करण्यात आले. यंदाचा ‘संत तुकाराम आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट पुरस्कार , ‘आनंदी गोपाळ’ ला देण्यात आला. तर ‘अ सन’ या ट्यूनेशियातील चित्रपटाला ‘प्रभात सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय ‘पुरस्कार मिळाला. मराठी विभागात ‘आनंदी गोपाळ’ चित्रपटाप्रमाणे अजित वाडीकर दिग्दर्शित ‘वाय’ आणि सुजय डहाके दिग्दर्शित ‘तुझ्या आयला’ या चित्रपटांनीही चांगले यश मिळवून महोत्सवातील विविध पुरस्कारांवर आपले नाव कोरले.

संत तुकाराम आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट पुरस्कार आनंदी गोपाळ ने पटकावला या चित्रपटाला पाच लाख रुपये मानचिन्ह व मानपत्र देऊन गौरवण्यात आले. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या वतीने देण्यात येणारा मराठी स्पर्धात्मक विभागातील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार डॉक्टर अजित वाडेकर(वाय ) यांना देण्यात आला. सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार ललित प्रभाकर (आनंदी गोपाळ) यांना, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार मुक्ता बर्वे (वाय) यांना, सर्वोत्कृष्ट पटकथा लेखक पुरस्कार नियाज मुजावर(तुझ्या आयला) यांना तर सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी पुरस्कार विजय मिश्रा (तुझ्या आयला) यांना प्रदान करण्यात आला.

प्रत्येकी पंचवीस हजार रुपये मानचिन्ह मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे सुजय डहाके दिग्दर्शित तुझ्या आयला आणि मेहडी बरसौई दिग्दर्शित ‘अ सन’ या चित्रपटाला प्रेक्षक लोकांच्या पसंतीचा (ऑडियन्स अवॉर्ड)ने गौरविण्यात आलं. आंतरराष्ट्रीय चित्रपटांच्या स्पर्धात्मक विभागात ‘अ सन ‘ या चित्रपटाला प्रभात सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. दहा लाख रुपये मानचिन्ह व प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. याच विभागातील प्रभात सर्वोत्कृष्ट चित्रपट दिग्दर्शन पुरस्काराने ‘सुपरनोवा’ चित्रपटाचे दिग्दर्शक बार्तोज कृहलिक यांना गौरवण्यात आले.

अठराव्या ‘पिफ’ चा समारोप गुरुवारी राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय येथे झाला. महोत्सवाचे संचालक डॉक्टर जब्बार पटेल, अभिनेते विक्रम गोखले, साउंड डिझायनर विश्वदीप चॅटर्जी, महोत्सवाचे सचिव रवी गुप्ता, समर नखाते, मकरंद साठे, सतीश आळेकर, अभिजीत रणदिवे, अभिजित देशपांडे, डॉक्टर मोहन आगाशे,मेघराज राजेभोसले, डॉक्टर सुनीता कराड आदि यावेळी उपस्थित होते.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/

You might also like