Anant Geete On Pawar Family | शरद पवारांचं घर कोणी फोडलं? शिवसेना नेते अनंत गीतेंनी केला गौप्यस्फोट, ‘या’ बड्या नेत्याचं नाव घेतल्याने खळबळ!

खेड : पोलीसनामा ऑनलाईन – Anant Geete On Pawar Family | पक्ष फोडला इथपर्यंत मी समजू शकतो. राजकारणात या गोष्टी घडतात. पण केवळ पक्ष नाही, फोडला घरही फोडले. ज्या शरद पवारांनी एवढे मोठे केले त्या पवार साहेबांचे (Sharad Pawar) घर फोडले, असे म्हणत शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नेते अनंत गीते यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एका नेत्याचे नाव घेतले. यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. गीते रत्नागिरी जिल्ह्यातील खेड (Khed Ratnagiri) येथील प्रचारसभेत बोलत होते.

अनंत गीते पुढे म्हणाले, आता ज्या शरद पवार साहेबांचे घर फोडले आहे, आज जवळ जवळ ८४ वर्ष त्यांचे वय आहे. या शेवटच्या काळात या वेदना त्यांना दिल्या आहेत. हे फोडण्याचे काम केले कुणी? या सर्वांचा सूत्रधार, कोण आहे जोरात सांगा. अरे पवार साहेबांचे घर कोणी फोडले. नावच आहे ‘तट-करे’. असे म्हणत गीते यांनी राष्ट्रवादीचे नेते सुनिल तटकरे यांच्या नावाचा गौप्यस्फोट केला.

अनंत गिते म्हणाले, पवार साहेबांचे घर त्याने फोडले आणि याचे शल्य त्यांच्या हृदयात आहे. सरकार गेले, आमदार गेले
खासदार गेले, याचे दुःख त्यांना नाही. त्यांच्याकडे क्षमता आहे. ते नव्याने आणखी जन्माला घालू शकतात.

गीते यांनी पुढे आणखी गौप्यस्फोट करताना म्हटले की, पवार साहेब मला म्हणाले, माझे घर याने फोडले आहे,
याला धडा शिकवल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, गीते मला त्याला धडा शिकवायचा आहे.
मी म्हटलं साहेब शंभर टक्के, यावेळेला सुनिल तटकरेंना (Sunil Tatkare) रायगडच्या (Raigad Lok Sabha)
राजकारणातून हद्दपार केल्याशिवाय मी राहणार नाही, असाही गौप्यस्फोट अनंत गीते यांनी केला.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ajit Pawar On Baramati Lok Sabha | बारामतीत सुनेत्रा पवारांचा पराभव झाल्यास तुमचे राजकीय करिअर धोक्यात येईल का? अजित पवार म्हणाले…

Pune Lok Sabha | पुणे लोकसभेसाठी मुरलीधर मोहोळ गुरुवारी भरणार अर्ज ! मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती, जंगी रॅली, भव्य सभा घेणार